September 17, 2024 4:41 PM September 17, 2024 4:41 PM

views 8

इतर भाषांचा आदर बाळगून हिंदीला प्रोत्साहन देणं गरजेचं – प्रसारभारती अध्यक्ष नवनीत कुमार सहगल

इतर भाषांचा आदर बाळगून हिंदीला प्रोत्साहन देणं गरजेचं असल्याचं प्रसारभारतीचे अध्यक्ष नवनीत कुमार सहगल यांनी म्हटलं आहे. हिंदी दिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. प्रसारभारतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी गौरव द्विवेदी तसंच आकाशवाणीच्या महासंचालक प्रज्ञा पालिवाल यावेळी उपस्थित होत्या.  आकाशवाणी मुंबई केंद्रातही हिंदी दिवस आणि हिंदी पखवाडा प्रारंभानिमित्त विशेष कार्यक्रम झाला.