June 27, 2025 11:03 AM June 27, 2025 11:03 AM

views 7

‘हिंदी ही इतर भारतीय भाषांची प्रतिस्पर्धी नसून सहचर आहे-केंद्रीय गृहमंत्री अमित शहा

'हिंदी ही इतर भारतीय भाषांची प्रतिस्पर्धी नसून सहचर आहे', असं प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काल केलं. नवी दिल्ली इथं राजभाषा विभागाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमामध्ये ते बोलत होते. प्रशासनानं लोकांच्या भाषेतच कामकाज करायला हवं, जोपर्यंत व्यक्ती तिच्या स्वतःच्या भाषेत व्यक्त होत नाही तोपर्यंत ती गुलामीच्या मानसिकतेतून बाहेर येणार नाही, असं शहा म्हणाले.

September 14, 2024 1:31 PM September 14, 2024 1:31 PM

views 8

हिन्दी भाषा दिनानिमित्त गृहमंत्री अमित शहा यांनी जनतेला दिल्या शुभेच्छा

देशभरात आज राष्ट्रीय हिंदी दिवस साजरा केला जात आहे. १४ सप्टेंबर १९४९ रोजी संसदेनं हिंदीला राष्ट्रीय भाषेचा दर्जा दिला होता. तेव्हापासून आजचा दिवस हिंदी दिवस म्हणून साजरा केला जातो. या निमित्तानं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी देशवासीयांना एका व्हिडीओ संदेशाद्वारे शुभेच्छा दिल्या आहेत.   हिंदी भाषा ही भारताचा अभिमान आणि परंपरा असल्याचंही त्यांनी या संदेशात म्हटलं आहे. या भाषेला वगळून प्रगती शक्य नाही असंही ते म्हणाले. केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनीही हिंदी भाषा दिनानिमित्त एक व...