December 29, 2024 7:56 PM December 29, 2024 7:56 PM

views 42

हिमाचल प्रदेशच्या उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती गुरमीत सिंह संधावालिया यांनी घेतली शपथ

हिमाचल प्रदेशच्या उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती गुरमीत सिंह संधावालिया यांनी आज शपथ घेतली. सिमला इथल्या राजभवनात झालेल्या कार्यक्रमात राज्यपाल शिव प्रताप शुक्ला यांनी त्यांना शपथ दिली. याकार्यक्रमाला मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुक्खू आणि इतर मंत्री उपस्थित होते. हिमाचल प्रदेशच्या उच्च न्यायालयात मुख्य न्यायाधीशपदी शुक्ला यांच्या नियुक्तीची अधिसूचना केंद्र सरकारनं २४ डिसेंबरला जारी केली होती.शुक्ला यांनी याआधी पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून काम केलं आहे.  

December 25, 2024 3:30 PM December 25, 2024 3:30 PM

views 45

हिमाचल प्रदेशात हिमवर्षावामुळे तीन राष्ट्रीय महामार्गांसह रस्ते वाहतुकीसाठी बंद

हिमाचल प्रदेशाच्या उंच डोंगराळ भागात झालेली बर्फवृष्टी आणि पावसामुळे संपूर्ण राज्य कडाक्याच्या थंडीत गारठून गेलं आहे. गेले तीन दिवस सुरु असलेल्या हिमवर्षावामुळे राज्यातल्या तीन राष्ट्रीय महामार्गांसह शेकडो रस्ते वाहतुकीसाठी बंद झाले आहेत, आणि अनेक भागात वीज पुरवठा खंडित झाला आहे. किन्नौर जिल्ह्यात मल्लिंग नाला इथं अडकलेल्या पर्यटकांना चांगो आणि पूहमध्ये सुरक्षित ठिकाणी आसरा देण्यात आला आहे. दरम्यान, कुल्लू जिल्ह्यात, सोलंग नाला, अटल बोगदा, धुंडी आणि कोठी यांसारख्या भागात जोरदार हिमवृष्टीमुळे दैन...

September 10, 2024 12:51 PM September 10, 2024 12:51 PM

views 9

हिमाचल प्रदेशात अनेक ठिकाणी भूस्खलन

हिमाचल प्रदेशाच्या विविध भागांत काल रात्रीपासून जोरदार पाऊस पडत असून, अनेक ठिकाणी भूस्खलन झालं आहे. त्यामुळे राष्ट्रीय महामार्गाला जोडणाऱ्या अनेक मार्गांवरची वाहतूक ठप्प झाली आहे. कांगड़ा, मंडी, कुल्लू, ऊना, हमीरपुर, बिलासपुर, सोलन, सिरमौर आणि सिमला इथं हवामान विभागानं जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.

August 12, 2024 9:22 AM August 12, 2024 9:22 AM

views 18

हिमाचल प्रदेशात मुसळधार पाऊस, पुरामुळे १२ जणांचा मृत्यू

हिमाचल प्रदेशातही पावसाचा जोर सर्वदूर कायम असून, ठिकठिकाणी आलेल्या पुरामुळे आतापर्यंत १२ जणांचा मृत्यू झाला तर तिघे जण बेपत्ता झाले आहेत. पूरग्रस्त भागात मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. किन्नौर या आदिवासी बहुल जिल्ह्यात अचानक झालेल्या पावसाने अनेक ठिकाणी भूस्खलनाच्या घटना घडल्या असून, पूह ते रोरीक दरम्यानच्या राष्ट्रीय महामार्गाचं नुकसान झालं आहे. सिमला जिल्ह्यातल्या चोपाल भागात तारापूर गावात पावसामुळे सफरचंद आणि ऑरकीड फुलांची साठवणूक केलेल्या पेटयांचं मोठं नुकसान झालं आहे. तसंच सीमूर जिल्ह्यात यमु...

August 5, 2024 8:27 PM August 5, 2024 8:27 PM

views 32

हिमाचल प्रदेशातील ढगफुटीच्या घटनांमधील बेपत्ता व्यक्तींचा शोध सुरूच

हिमाचल प्रदेशातील शिमला, मंडी आणि कुल्लू मधल्या नुकत्याच झालेल्या ढगफुटीच्या घटनांमधील बेपत्ता व्यक्तींचा शोध आज पाचव्या दिवशीही सुरूच आहे. आतापर्यंत राज्यातील विविध ठिकाणांहून १५ मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. तर ४० लोक अजूनही बेपत्ता आहेत. याशिवाय, कुल्लू जिल्ह्यातील मलानामधून १५ स्थानिक रहिवाशांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे.   उत्तराखंडमध्ये रुद्रप्रयाग जिल्ह्यातल्या केदारनाथ धामसह केदारघाटीच्या आपत्तीग्रस्त भागात पाचव्या दिवशी मदत आणि बचाव कार्य सुरूच आहे. आतापर्यंत १० हजारांहून अधिक लोका...

August 5, 2024 1:48 PM August 5, 2024 1:48 PM

views 15

वायनाड,आणि हिमाचल प्रदेशात भूस्खलन स्थळी बचावकार्य सुरु

केरळमधे वायनाड इथं दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेनंतर मृतदेह शोधण्याचं काम आज सातव्या दिवशीही सुरू आहे. या भागात शंभरहून अधिक जण बेपत्ता आहेत. काल ड्रोनच्या मदतीनं मृतदेह शोधण्याचं काम करण्यात येत होतं. दरड कोसळण्यापूर्वीच्या परिसराचा नकाशा आणि दरड कोसळल्यानंतर बदलल्या स्थितीची तुलना करून शोध घेतला जात आहे. या कामासाठी सैन्याची अतिरिक्त कुमक आणि श्वानपथकाला मेरठहून पाचारण केलं आहे. मेपडी इथं ठेवलेल्या ६७ मृतदेहांपैकी ८ जणांवर अंत्यसंस्कार झाले आहेत. उर्वरित मृतदेहांची ओळख पटवण्याचं काम सुरू आहे, अ...

August 1, 2024 8:20 PM August 1, 2024 8:20 PM

views 19

हिमाचल प्रदेशात ढगफुटीमुळे झालेल्या दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, ५५ जण बेपत्ता

हिमाचल प्रदेशात काल रात्री तीन ठिकाणी झालेला मुसळधार पाऊस आणि ढगफुटीमुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचं वृत्त आहे. त्यानंतर आलेल्या पुरात ५५ जण बेपत्ता झाले असून २ जणांचा मृत्यू झाला आहे. या ढगफुटीमुळे शिमला जिल्ह्यात ३६ जण तर मंडी जिल्ह्यात ९ जण बेपत्ता झाले असून २ मृतदेह सापडले आहेत, अशी माहिती उपायुक्त अनुपम कश्यप यांनी दिली. शिमल्याच्या रामपूर उपविभाग प्रशासनानं एनडीआरएफ आणि सीआयएसएफ च्या तुकड्यांच्या मदतीनं बचावकार्य सुरु केल्याचं त्यांनी सांगितलं.