December 20, 2025 7:49 PM December 20, 2025 7:49 PM

views 27

व्हॉट्सॲप खात्यांवर सायबर हल्ले होण्याची शक्यता असल्याचा इशारा

व्हॉट्सॲप इतर उपकरणांशी जोडण्याच्या प्रक्रियेतल्या कमजोर दुव्यामुळे व्हॉट्सॲप खात्यांवर सायबर हल्ले होण्याची शक्यता असल्याचा इशारा सीईआरटी या भारताच्या सायबर सुरक्षा संस्थेनं दिला आहे. या कमजोर दुव्याला ‘घोस्ट पेअरिंग’ असं नाव देऊन यासंदर्भात संस्थेनं मार्गदर्शक सूचना जारी केल्या. व्हॉट्सॲपचं खातं एखाद्या उपकरणाशी जोडताना पडताळणी न करता पेअरिंग कोड्स वापरून सायबर हल्लेखोर व्हॉट्सॲप खात्यांचं पूर्ण नियंत्रण मिळवू शकतात, यासाठी पासवर्ड किंवा सिमकार्ड बदलण्याची गरज लागत नाही, अशी भीती यात व्यक्त कर...