April 7, 2025 9:12 PM

views 10

बदलापूर चकमक प्रकरणी पाच पोलिसांविरुद्ध गुन्हे दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश

बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातला आरोपी अक्षय शिंदे याच्या चकमक प्रकरणी पाच पोलिसांविरुद्ध गुन्हे दाखल करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं आज दिले. या प्रकरणी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेचे सहआयुक्त लखमी गौतम यांच्या देखरेखीखाली एसआयटी स्थापन करण्याचे आदेशही उच्च न्यायालयानं दिले आहेत. न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे आणि नीला गोखले यांच्या खंडपीठासमोर आज ही सुनावणी झाली. शिंदे याच्या मृत्युप्रकरणात आरोपी पोलिसांवर गुन्हे दाखल न करण्याच्या राज्य सरकारच्या भूमिकेवरही उच्च न्यायालयानं ताशेरे ओढले ...

February 22, 2025 10:32 AM

views 49

कर्मचारी भरतीबाबतच्या प्रस्तावांवर त्वरित निर्णय घेण्याच्या सूचना- मुंबई उच्च न्यायालय

मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला कर्मचारी भरतीबाबतच्या प्रस्तावांवर त्वरित निर्णय घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. न्यायाधीश ए. एस. गडकरी आणि कमल खटा यांच्या खंडपीठाने कर्मचाऱ्यांच्या कमतरतेच्या मुद्द्यावर स्वेच्छेने दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना काल या सूचना दिल्या.   केवळ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करणे हे कमी मनुष्यबळाचा सामना करण्यासाठी पुरेसं नाही; तर कर्मचाऱ्यांना आधुनिक न्यायालयीन आवश्यकता पूर्ण करण्यासाठी तांत्रिकदृष्ट्या पात्र कर्मचाऱ्यांची गरज असल्याचं मत न्यायालयानं व्य...