September 12, 2024 5:10 PM

views 18

भारताला हाय अल्टीट्यूड पाणबुडी विरोधी यंत्रणा देण्याचा अमेरिकेचा निर्णय

 हाय अल्टिट्युड अँटी सबमरिन वॉरफेअर हे पाणबुडीरोधक युद्ध  तंत्रज्ञान अमेरिका भारताला विकणार आहे. ५ कोटी २८ लाख रूपये  किमतीचं हे तंत्रज्ञान असून त्यामुळे भारताला एमएच ६० आर या हेलिकॉप्टरमधून पाणबुड्यांवर मारा करता येईल. या प्रस्तावित व्यवहारामुळे भारत आणि अमेरिकेतल्या द्वीपक्षीय संबंधांना नवे आयाम मिळणार असल्याचं अमेरिकेच्या संरक्षण विभागानं म्हटलं आहे.