October 29, 2024 7:52 PM October 29, 2024 7:52 PM
11
हिजबुल्लाहचा नवा प्रमुख म्हणून नईम कासीमच्या नावाची घोषणा
हिजबुल्लाहचा नवा प्रमुख म्हणून या संघटनेच्या संस्थापक सदस्य असलेल्या नईम कासीम च्या नावाची घोषणा हिजबुल्लाहनं केली आहे. ७१ वर्षांचा कासीम या संघटनेत १०९१ पासून उपसरचिटणीस म्हणून काम करत आहे. महिन्याभरापूर्वी इस्रायलनं केलेल्या बॉम्बहल्ल्यात मारला गेलेल्या हसन नसरल्लाह ची जागा आता कासीम घेईल. १९९७ मधे अमेरिकेनं हिजबुल्लाहला परदेशी दहशतवादी संघटना म्हणून घोषित केलं. त्यानंतर आतापर्यंत ६० पेक्षा जास्त देश आणि संघटनांनी हिजबुल्लाहला अंशतः किंवा पूर्णपणे दहशतवादी गट म्हणून घोषित केलं आहे.