July 12, 2025 7:53 PM July 12, 2025 7:53 PM
13
परभणीत हेमलिब्रा या इंजेक्शनचं लोकार्पण
हिमोफीलिया या आजारावरच्या हेमलिब्रा या इंजेक्शनचं लोकार्पण परभणीच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या हस्ते आज परभणी जिल्हा सामान्य रुग्णालयात झालं. हे इंजेक्शन उपलब्ध झालेलाय परभणी हा राज्यातला पहिला जिल्हा आहे. या आजाराच्या रुग्णांना आता उपचारासाठी जिल्ह्याबाहेर जायची गरज पडणार नाही, असं प्रतिपादन त्यांनी यावेळी केलं. बोर्डीकर यांनी हिमोफीलियाग्रस्त रुग्णांची, तसंच जिल्हा रुग्णालयात पहिल्यांदाच कर्करोगाची शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णाला भेटून त्यांची विचारपूस केली.