November 28, 2024 8:21 PM

views 9

झारखंडचे मुख्यमंत्री म्हणून हेमंत सोरेन यांचा शपथविधी

झारखंड मुक्ती मोर्चाचे नेते हेमंत सोरेन यांनी आज चौथ्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. राज्यपाल संतोष गंगवार यांनी आज रांची इथल्या मोरहाबादी मैदानावर झालेल्या कार्यक्रमात त्यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली. यावेळी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान, दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी के शिवकुमार, समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव, ज्येष्ठ आरजे...

November 7, 2024 7:57 PM

views 14

हेमंत सोरेन यांच्या नेतृत्वाखालील सरकारवर झारखंडची जनता नाखूश – मंत्री अन्नपुर्णादेवी

झारखंडमध्ये मतदानाच्या पहिल्या टप्प्यातल्या मतदारसंघांमध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडी आणि इंडिया आघाडी यांच्या प्रचारसभांंचा धडाका सुरु आहे. हेमंत सोरेन यांच्या नेतृत्वाखालील सरकारवर झारखंडची जनता नाखूश असल्याचा दावा जेष्ठ भाजपा नेत्या आणि केंद्रीय मंत्री अन्नपुर्णादेवी यांनी हजारीबाग इथं बोलताना केला. झारखंडमधले अनेक प्रकल्प हे हेमंत सोरेन याच्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीत पूर्ण झाले आहेत असा दावा  झारखंड मुक्ती मोर्चाच्या कल्पना सोरेन यांनी खुंटी इथल्या सभेत बोलताना केला. काँग्रेस, राजद, ऑल झ...

June 28, 2024 12:35 PM

views 12

झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांचा जामीन मंजूर

झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना आज झारखंड उच्च न्यायालयानं जामीन मंजूर केला. मनीलाँडरिंग प्रकरणी सुमारे साडेआठ एकर जमीनीचा ताबा अवैधपणे घेतल्याचा आरोप सोरेन यांच्यावर आहे. सक्तवसुली संचालनालयाने गेल्या ३१ जानेवारीला सक्तवसुली संचालनालयाने त्यांना अटक केली होती.