June 15, 2025 3:15 PM June 15, 2025 3:15 PM

views 7

उत्तराखंडमध्ये हेलिकॉप्टर अपघातात सात जणांचा मृत्यू, मृतांमध्ये यवतमाळच्या तिघांचा समावेश

उत्तराखंडमध्ये केदारनाथ परिसरात असलेल्या गौरीकुंड खार्क या डोंगराळ भागात आज सकाळी एक हेलिकॉप्टर कोसळून झालेल्या अपघातात सहा यात्रेकरू आणि पायलटसह सात जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये यवतमाळच्या वणी इथल्या जयस्वाल कुटुंबातल्या तीन जणांचा समावेश आहे.   हे हेलिकॉप्टर केदारनाथहून गुप्तकाशीला जात होतं. घटनेची माहिती मिळताच, बचाव पथकं घटनास्थळी रवाना झाली आणि मदत आणि बचाव कार्याला सुरूवात झआली.  ‘एसडीआरएफ’, अर्थात, ‘राज्य आपत्ती निवारण दला’नं दिलेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त हेलिकॉप्टर पूर्णपणे ज...

January 5, 2025 7:42 PM January 5, 2025 7:42 PM

views 7

गुजरातमधे झालेल्या हेलिकॉप्टरअपघातात तिघांचा मृत्यू

भारतीय तटरक्षक दलाच्या हेलिकॉप्टरला आज गुजरात मधल्या पोरबंदर विमानतळाच्या धावपट्टीवर झालेल्या अपघातात दोन वैमानिक आणि एका क्रू सदस्याचा मृत्यू झाला. हे हेलिकॉप्टर आपला नियमित सराव करत असताना ही दुर्घटना घडली, अपघाताचं नेमकं कारण शोधण्यासाठी पुढील तपास सुरु झाल्याचं तटरक्षक दलानं सांगितलं.

October 2, 2024 7:30 PM October 2, 2024 7:30 PM

views 3

पुण्यात हेलिकॉप्टर कोसळून झालेल्या दुर्घटनेत तीन जणांचा मृत्यू

पुण्यात बावधन इथं आज सकाळी हेलिकॉप्टर कोसळून झालेल्या दुर्घटनेत तीन जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये दोन वैमानिक आणि एका अभियंत्याचा समावेश आहे. हे हेलिकॉप्टर पुण्याहून मुंबईच्या दिशेने निघालं होतं. बावधन परिसरातून आज सकाळी पावणे सात वाजता हेलिकॉप्टरने धुके असताना देखील उड्डाण केलं, त्यानंतर हा अपघात झाला. घटनास्थळी पुणे महानगरपालिका, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण तसंच अग्निशमन दलाकडून बचावकार्य करण्यात आलं.