July 6, 2024 11:30 AM
22
देशाच्या ईशान्य भागात मुसळधार पावसाचा अंदाज
हिमाचल प्रदेश, मध्य प्रदेश, उत्तराखंड आणि देशाच्या ईशान्य भागात उद्यापर्यंत तर पंजाब आणि वायव्य भारतात आज मुसळधार पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागानं व्यक्त केला आहे. पूर्व आणि ईशान्य भारतात पुढील 5 दिवस वादळ आणि गडगडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा तर कर्नाटकच्या किनारी भागातही काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे.