October 26, 2025 7:35 PM October 26, 2025 7:35 PM

views 13

पुढले दोन ते चार दिवस पश्चिम बंगालचा गंगेच्या खोऱ्यातला प्रदेशात मुसळधार पाऊस

बंगालच्या उपसागरात आग्नेयेकडे निर्माण झालेला कमी दाबाचा पट्टा उद्यापर्यंत आणखी वायव्य दिशेला सरकेल, आणि येत्या मंगळवारपर्यंत त्याचं तीव्र चक्रीवादळात रूपांतर होईल, असा हवामान विभागाचा अंदाज आहे. हे चक्रीवादळ मछलीपट्टणम आणि कलिंगपट्टणम दरम्यान काकीनाडा जवळ आंध्र प्रदेशच्या किनाऱ्यावर धडकण्याची शक्यता आहे. त्याच्या प्रभावामुळे पुढले दोन ते चार दिवस पश्चिम बंगालचा गंगेच्या खोऱ्यातला प्रदेश, आंध्र प्रदेश, तेलंगणा, छत्तीसगड आणि ओदिशाच्या किनारपट्टी भागात मुसळधार पाऊस पडेल  आणि जोरदार वारे वाहतील असा ...

July 26, 2025 8:34 PM July 26, 2025 8:34 PM

views 10

महाराष्ट्रात पावसाचा जोर कायम, धरणाच्या पाणी पातळीत वाढ

महाराष्ट्रात बहुतांश जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढला असून विविध धरणांमधल्या पाणीसाठ्यात झपाट्यानं वाढ होत आहे. मुंबई आणि उपनगरांत आज सकाळपासून पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी कोसळत होत्या. रायगड जिल्ह्यात ताम्हिणी घाट आणि घाटमाथ्यावर जोरदार पावसामुळे सावित्री नदीनं इशारा पातळी ओलांडली आहे. गोंदिया जिल्ह्यात संततधारेमुळे अनेक भागांतल्या नद्या, नाले तुडुंब भरून वाहत आहेत. सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर वाढल्यानं धरणांमधली पाणीपातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी कोयनेसह पाच धरणांतून सकाळपासून...

July 5, 2025 3:09 PM July 5, 2025 3:09 PM

views 21

कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, मध्यप्रदेश, उत्तराखंडमध्ये आज मुसळधार पाऊस

कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, मध्यप्रदेश आणि उत्तराखंडमध्ये आज जोरदार ते अती जोरदार पाऊस पडेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. छत्तीसगड, कर्नाटकचा किनारपट्टी प्रदेश, पश्चिम बंगालचा गंगेच्या खोऱ्यातला प्रदेश, राजस्थान आणि हिमाचलप्रदेशमध्ये देखील आज  अती जोरदार पाऊस पडेल असा अंदाज आहे.    अंदमान निकोबार द्वीप समूह, बिहार, झारखंड, ओदिशा, जम्मू, काश्मीर, लडाख, गिलगिट, बाल्टिस्तान आणि मुझफ्फराबादमध्ये आज मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे.    देशाचा वायव्य आणि ईशान्येकडचा प्रदेश, पूर्व, पश्चिम, मध...

June 17, 2025 8:06 PM June 17, 2025 8:06 PM

views 10

गुजरातमधल्या सौराष्ट्र आणि कच्छमध्ये जोरदार पाऊस

गुजरातमधल्या सौराष्ट्र आणि कच्छमधे नैऋत्य मोसमी पाऊस पुढे सरकल्यामुळे या भागात जोरदार पाऊस सुरू आहे. सौराष्ट्रमधल्या बोताड, अमरेली, सुरेंद्रपूर, भावनगर या जिल्ह्यांमधे सलग दुसऱ्या दिवशी मुसळधार पावसानं हजेरी  लावली. गुजरातचे मुख्यमंत्री भुपेंद्र पटेल यांनी गांधीनगर इथं तातडीची बैठक बोलावून पावसाच्या परिस्थितीचा आढावा घेतला. पावसामुळे बाधित झालेल्या जिल्ह्यांमधे एनडीआरएफची ५ आणि एसडीआरएफची २० पथकं तैनात केली असून  पावसाच्या पाण्यात अडकलेल्या शंभरहून अधिक लोकांना वाचवण्यात यश आलं आहे. 

May 28, 2025 8:11 PM May 28, 2025 8:11 PM

views 24

देशाच्या सर्व भागात उद्या मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता

भारतीय हवामान विभागानं उद्या आसाम, मेघालय, कर्नाटकाचा किनारी भाग आणि दक्षिण कर्नाटक, केरळ, नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा, तामिळनाडू, पुद्दुचेरी आणि कराईकल इथं मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. अरुणाचल प्रदेश,ओडिशा,तेलंगणा,पश्चिम बंगाल आणि सिक्कीम इथेही उद्या जोरदार पर्जन्यवृष्टीची शक्यता आहे. उत्तराखंड, बिहार, छत्तीसगढ, आंध्र प्रदेशचा किनारी भाग, झारखंड, कोकण,गोवा,मध्य महाराष्ट्र,विदर्भ आणि पश्चिम मध्य प्रदेश इथेही जोरदार पर्जन्यमान होईल असा अंदाज आहे. ईशान्य भारतात पुढचे ७ ...

August 22, 2024 1:29 PM August 22, 2024 1:29 PM

views 14

त्रिपुरातील अनेक भागांमध्ये पूरपरिस्थिती, आजही मुसळधार पावसाचा इशारा

त्रिपुरात सतत होणाऱ्या पावसामुळं राज्यातल्या अनेक भागांमध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली असून भारतीय हवामान विभागानं आजही मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. गोमती आणि मुहुरी या मुख्य नद्यांनी धोक्याची पातळी ओंलाडली असल्यानं शेकडो हेक्टर क्षेत्रावरल्या पिकांची नासाडी झाली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून परिस्थितीचा आढावा घेतला.    मुख्यमंत्री डॉ. माणिक साहा यांनी आगरतळा इथल्या पूरग्रस्त भागांची पाहणी केली असून परिस्थितीचा आढावा घेतला.

August 8, 2024 2:29 PM August 8, 2024 2:29 PM

views 5

जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि राजस्थान मध्ये मुसळधार पावसाची शक्यता

  भारतीय हवामान विभागानं देशाच्या पूर्व, पश्चिम, मध्य, वायव्य आणि ईशान्य भागात विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज वर्तवला आहे. पुढल्या ५ दिवसांत देशाच्या दक्षिण भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल तर कर्नाटकच्या किनारपट्टीवर आज मुसळधार पावसाची शक्यता आहे.   हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, राजस्थान, उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणा, चंदीगड आणि जम्मू-काश्मीरमध्ये शनिवारपर्यंत मुसळधार पावसाची शक्यता आहे. झारखंड, उत्तर ओदिशा, छत्तीसगडमध्ये कमी दाबाचं क्षेत्र तयार होण्याची शक्यता असल्...

August 3, 2024 1:22 PM August 3, 2024 1:22 PM

views 15

मुंबई मध्ये सकाळपासून पावसाची संततधार सुरू

मुंबई शहर आणि उपनगरात सकाळपासून पावसाची संततधार सुरू आहे. काही ठिकाणी सखल भागात पाणी साचल्यानं वाहतूक धीम्या गतीनं सुरू आहे. उपनगरी रेल्वे गाड्या नियमित वेळेत धावत आहेत.   मुंबई आणि ठाणे जिल्ह्याला हवामान विभागानं आज जोरदार पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. रायगड, पुणे, रत्नागिरी आणि कोल्हापूर जिल्ह्यांसाठी मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.   दरम्यान, हवामान विभागानं सातारा जिल्ह्याला अति मुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी केला आहे.   

July 27, 2024 9:50 AM July 27, 2024 9:50 AM

views 12

कोल्हापूर जिल्ह्यात महापुराचं संकट

  कोल्हापूर शहरातील पूरबाधित भागात पाणी घुसू लागलं असून, नागरिकांचं स्थलांतर सुरू आहे. दूध, भाजीपाला वाहतूक ठप्प झाली आहे. अधून मधून कोसळणाऱ्या सरी वगळता पावसाचा जोर कमी झाला असला तरी पुराचा विळखा‌ अद्याप कायम आहे. यामुळे २६५ मालमत्तांची पडझड झाली असून जिल्ह्यात आज पर्यंत ९८.६२ लाख रुपयांचं नुकसान नुकसान झाल्याची माहितीजिल्हा प्रशासनानं दिली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात एनडीआरएफ चे एक पथक या पूर्वीच दाखल झाले असून आणखी एक पथक आज दाखल होणार आहे. आगामी १० दिवस कोल्हापूर जिल्ह्यात पाऊस राहणार असून...

July 20, 2024 7:32 PM July 20, 2024 7:32 PM

views 18

राज्यात अनेक ठिकाणी पावसाच्या सरी

राज्यात आज अनेक जिल्ह्यात पावसानं जोरदार हजेरी लावली. रायगड, साताऱ्यातील घाट परिसर, नागपूर, वर्धा आणि चंद्रपूर जिल्ह्यासाठी आज हवामान विभागानं रेड अलर्ट जारी केला आहे.   रायगड जिल्ह्यात सर्व नद्यांना पूर आले असून रोह्यात कुंडलिका नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे. रोह्याजवळ भिसे खिंडीत दरड कोसळली आहे.   रत्नागिरी जिल्ह्यात भातलावण्या अंतिम टप्प्यात आल्या आहेत. दुर्गम भागातली गावं सोडून चिखलणी शेतीच्या अनेक कामांसाठी पॉवर टिलरचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जाऊ लागला आहे.   विदर्भात अ...