January 24, 2026 6:16 PM

views 7

इंडोनेशियात मुसळधार पावसामुळे भूस्खलन झाल्यानं ७ जणांचा मृत्यू

इंडोनेशियाच्या पश्चिम जावा प्रान्तात मुसळधार पावसामुळे भूस्खलन झाल्यानं ७ जणांचा मृत्यू तर सुमारे ८२ लोक बेपत्ता झाले आहेत. या भागात आठवडाभर मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आधीच वर्तवण्यात आली आहे.  

November 28, 2025 2:30 PM

views 44

दितवा चक्रीवादळामुळे देशाच्या पूर्व किनारपट्टी भागात मुसळधार पावसाचा अंदाज

उत्तर-पश्चिम बंगालच्या उपसागरात तयार झालेलं दितवा चक्रीवादळ तमिळनाडू, पुद्दुचेरी आणि आंध्र प्रदेशच्या किनारपट्टी भागांकडे सरकत आहे. यामुळे देशाच्या पूर्व किनारपट्टी भागात १ डिसेंबरपर्यंत मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.  बंगालच्या उपसागराच्या आग्नेय भागांमध्ये, मनार आणि कन्याकुमारी भागात सोमवारपर्यंत मच्छीमारांनी समुद्रात जाणं टाळावं असा सल्ला देण्यात आला आहे. दक्षिणेकडील किनारी भागांमध्ये काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे. तमिळनाडूच्या उत्तरेकडील भागांत पुढील तीन दिवसांत जोरद...

October 21, 2025 12:32 PM

views 61

तामिळनाडूमध्ये मुसळधार पावसाचा इशारा

भारतीय हवामान विभागानं येत्या चार दिवसांसाठी तामिळनाडूमध्ये मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. पुढचे दोन दिवस पुद्दुचेरी आणि कराईकलमध्ये अति मुसळधार पावसाची शक्यताही हवामान विभागानं वर्तवली आहे. आंध्र प्रदेश, कर्नाटक, केरळ, पुद्दुचेरीमधे माहे, लक्षद्वीप आणि अंदमान आणि निकोबार बेटांवर उद्या मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.  कर्नाटकाचा अंतर्गत भाग, केरळ, लक्षद्वीप, ओडिशा, तेलंगणा आणि अंदमान आणि निकोबार बेटांवर आज विजांच्या कडकडाटासह वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे.

October 5, 2025 3:30 PM

views 135

शक्ती चक्रीवादळाच्या प्रभावामुळे देशात मुसळधार पाऊस

ईशान्य अरबी समुद्रात निर्माण झालेल्या शक्ती या चक्रीवादळाची तीव्रता वाढत असून पुढच्या काही दिवसात ते अधिक शक्तिशाली होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी चक्रीवादळाचा इशारा देण्यात आला आहे. ७ ऑक्टोबरपर्यंत उत्तर कोकण किनारपट्टी भागात जोरदार वाऱ्यांसह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. समुद्रात सध्या १०० किमी प्रतितास वेगाने वारे वाहत असल्याने मच्छिमारांनी ७ ऑक्टोबरपर्यंत समुद्रात जाऊ नये असा इशारा दिल...

September 29, 2025 3:10 PM

views 36

अतिवृष्टीमुळं ४१ हजारांपेक्षा अधिक नागरिक स्थलांतरित

अतिवृष्टीमुळं राज्यातले ४१ हजारांपेक्षा अधिक नागरिक स्थलांतरित झाले आहेत, अशी माहिती राज्य सरकारनं दिली आहे. सर्वाधिक १३ हजारांहून अधिक नागरिक सोलापूरात स्थलांतरित झाले आहेत. तर जालन्यात साडे ८ हजार, छत्रपती संभाजीनगरमध्ये ८ हजारांहून अधिक आणि धाराशिवमध्ये सुमारे ४ हजार नागरिक स्थलांतरित झाले आहेत. गेल्या २४ तासात पुरात वाहून गेल्यानं राज्यात ३ जणांचा मृत्यू झाला. त्यात अहिल्यानगरमध्ये २ आणि नांदेडमधल्या एका व्यक्तीचा समावेश आहे.    राज्यात सध्या राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे १८ आणि राज्य...

September 29, 2025 3:17 PM

views 61

राज्यात विशेष अधिवेशन बोलावण्याची काँग्रेसची मागणी

राज्यात अतिवृष्टी, शेतकऱ्यांचं झालेलं नुकसान, त्यांना मिळणारी नुकसान भरपाई या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलावण्यात यावं, अशी मागणी काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्याकडे केली आहे. यासंदर्भात त्यांनी राज्यपालांना पत्र लिहिलं आहे. अतिवृष्टीने शेतकऱ्यांचं न भरून येणारं नुकसानं झालं आहे, या स्थितीत राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्यात यावा, शेतकऱ्यांना सरसकट मदत करावी आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी आदी मागण्या वडेट्टीवार यांनी केल्या आहेत...

September 29, 2025 3:16 PM

views 97

Maharashtra Flood : राज्यात पूरस्थिती कायम

राज्यात अनेक ठिकाणी पाऊस ओसरला असला तरी अद्याप पूरस्थिती कायम आहे. गोदावरी नदीला पूर आला आहे. जायकवाडी धरणातून तीन लाख क्युसेक्स इतका विसर्ग करण्यात आल्याने पैठण शहरात पाणी शिरलं आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून जवळपास दहा हजार जणांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे. जायकवाडी धरणातून केलेल्या विसर्गामुळे नांदेड जिल्ह्यात विष्णुपुरी प्रकल्पात पाण्याची आवक वाढली आहे. त्यामुळे प्रकल्पातून जवळपास तीन लाख क्युसेक्स इतका विसर्ग सुरू आहे. पुरामुळे नांदेड शहरातल्या अनेक भागात पाणी शिरलं आहे. नांदेड मह...

September 24, 2025 1:24 PM

views 56

शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी सरकार प्रयत्नशील – कृषीमंत्री दत्तात्रय भरणे

महाराष्ट्रात मराठवाडा, सोलापूर, अहिल्यानगर इथं गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसानं जनजीवन विस्कळीत झाले आहे. पावसामुळे शेतकऱ्यांचं हातातोंडाशी आलेलं पीक पाण्यात गेलं असून त्यांचं मोठं नुकसान झालं. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह अनेक मंत्री बांधावर जाऊन पाहणी करत आहेत,    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सकाळी सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील निमगाव आणि सिना दारफळ या गावांना भेट देत पूरस्थितीची पाहणी केली. दुपारी ते लातूर आणि धाराशी...

September 22, 2025 2:43 PM

views 34

राज्यात जोरदार पावसामुळे जनजीवन विस्कळीत

राज्यात झालेल्या जोरदार पावसामुळे अनेक जिल्ह्यात जनजीवन विस्कळीत झालं आहे.    धाराशिव जिल्ह्यात परंडा तालुक्यातल्या साकत गावात मुसळधार पावसामुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली असून अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधून परिस्‍थितीचा आढावा घेतला आणि या गावात  अडकलेल्या १२ नागरिकांना बाहेर काढण्यासाठी सैन्यादलाच्या हेलिकॉप्टरची व्यवस्था करण्याचे निर्देश पवार यांनी दिले.   बीड जिल्ह्यतल्या माजलगाव धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस झाला आहे. पावसाम...

September 18, 2025 1:32 PM

views 16

Uttarakhand: मुसळधार पावसामुळे ७ जण अद्याप बेपत्ता

उत्तराखंडमध्ये, चमोली जिल्ह्यातल्या नंदनगर घाट परिसरात मुसळधार पावसामुळे मोठं नुकसान झालं असून, कुंटरी लंगाफली प्रभागातली सहा घरं चिखलात गाडली गेल्याचं वृत्त आहे. आतापर्यंत २ जणांचा बचाव करण्यात यश मिळालं  असून, ७ जण अद्याप बेपत्ता असल्याची माहिती राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागानं दिली. पूरग्रस्त भागात बचाव आणि मदत कार्य वेगाने सुरु असून, प्रशासन परिस्थितीकडे बारकाईने लक्ष ठेवत असल्याचं  मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांनी सांगितलं.    आंध्रप्रदेश, कर्नाटकचा किनारपट्टी प्रदेश, केरळ, तामिळनाडू, पुडु...