April 7, 2025 8:22 PM April 7, 2025 8:22 PM

views 10

विदर्भात उष्णतेची लाट येण्याचा हवामान विभागाचा इशारा

कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी काल कमाल तापमानात किंचित वाढ झाली, रात्रीचं तापमान सरासरीइतकंच होतं. येत्या दोन दिवसात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी हवामान उष्ण आणि वातावरण दमट राहण्याची शक्यता आहे तर याच कालावधीत विदर्भात उष्णतेची लाट येण्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. नागपूर आणि अकोला जिल्ह्याला हवामान विभागानं उष्णतेच्या लाटेचा यलो अलर्ट दिला आहे. यवतमाळ आणि उत्तर महाराष्ट्रातल्या जळगाव जिल्ह्यात तुरळक ठिकाणी उद्या उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. 

April 6, 2025 8:42 PM April 6, 2025 8:42 PM

views 16

येत्या ३-४ दिवसात महाराष्ट्रासह देशाच्या विविध भागात कमाल तापमानात

येत्या ३-४ दिवसात महाराष्ट्र, वायव्य भारत, मध्य भारत आणि  दक्षिण द्वीपकल्पात कमाल तापमानात २ ते ४ अंश सेल्सिअस वाढ होण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे.  गुजरात, राजस्थान, हरियाणा चंदीगढ, दिल्ली आणि पंजाबमधे पुढचे चार-पाच दिवस उष्णतेची लाट राहण्याची शक्यता आहे.    पूर्व भारतात येत्या १० तारखेपर्यंत विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. पूर्व आणि ईशान्य भारत तसंच कर्नाटक आणि आंध्रप्रदेश किनारपट्टीवर पुढचे पाच दिवस सोसाट्याचा वारा विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह ह...

March 16, 2025 7:26 PM March 16, 2025 7:26 PM

views 24

येत्या दोन दिवसात राज्यात उष्णतेची लाट

येत्या दोन दिवसात विदर्भात उष्णतेची लाट येण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे. मुंबईत उष्णतेची लाट कायम असून आज आणि उद्या कमाल तापमान सुमारे ३६ अंश सेल्सियस इतकं राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. या दरम्यान किमान तापमान २३ अंश सेल्सियस राहील. सोमवारी किमान तापमानात एका अंशाची घट दिसून येईल, असंही हवामान विभागाने कळवलं आहे.   गेल्या चोवीस तासात, विदर्भात काही ठिकाणी उष्णतेची लाट होती, विदर्भात बहुतांश ठिकाणी, तर  मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी कमाल तापमा...

February 25, 2025 3:25 PM February 25, 2025 3:25 PM

views 9

मुंबईसह कोकणात उष्णतेची तीव्र लाट

मुंबईसह कोकणात सर्व जिल्ह्यांमधे पुढचे तीन दिवस उष्णतेची तीव्र लाट येण्याचा इशारा भारतीय हवामान विभागानं दिला आहे. या परिसरात तापमान ३७ ते ३८ अंश सेल्सिअस पर्यंत वाढेल, असा अंदाज आहे. त्यामुळे हवामान विभागानं यलो अलर्ट जारी केला आहे.