March 22, 2025 9:52 AM March 22, 2025 9:52 AM
5
लंडनच्या हिथ्रो विमानतळावरची उड्डाण सेवा पूर्ववत
लंडनमधील सर्वात मोठ्या हिथ्रो विमानतळाचा वीजपुरवठा सुरळीत झाला असून आता विमानसेवा पूर्ववत सुरू झाली असल्याचं या विमानतळाचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. विमानतळाची वीज काल खंडीत झाल्यानंतर हवाईवाहातूक दिवसभरासाठी बंद ठेवण्यात आली. विमानसेवा विस्कळीत झाली. वीजपुरवठा करणाऱ्या उपस्थानकाला आग लागल्यानं वीज पुरवठा खंडीत झाला होता.