June 16, 2024 8:45 PM June 16, 2024 8:45 PM
19
बिहार, झारखंड, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि उत्तराखंडमधल्या तुरळक भागात उष्णतेची तीव्र लाट
बिहार, झारखंड, ईशान्य मध्य प्रदेश, उत्तर छत्तीसगड आणि उत्तराखंडमधल्या तुरळक भागात पुढील दोन दिवसांत उष्णतेच्या तीव्र लाटेचा अंदाज भारतीय हवामान विभागानं वर्तवला आहे. उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणा, चंदीगड आणि दिल्लीच्या बहुतांश भागातही हीच परिस्थिती राहण्याची शक्यता आहे. हिमाचल प्रदेश, जम्मू आणि उत्तर राजस्थानच्या काही भागात मंगळवारपर्यंत उष्णतेची तीव्र लाट येण्याची शक्यता आहे, असंही हवामान विभागानं म्हटलं आहे. पंजाबमधल्या गुरुदासपूर इथं काल, सर्वाधिक कमाल तापमान ४६ पूर्णांक ५ अंश सेल्सिअस इतकं नो...