March 14, 2025 7:52 PM March 14, 2025 7:52 PM
15
येत्या दोन दिवसात देशाच्या काही भागात उष्णतेची लाट येण्याचा इशारा
येत्या दोन दिवसांत छत्तीसगढ, झारखंड, विदर्भ, पश्चिम बंगाल, तेलंगण आणि आंध्र प्रदेशात काही ठिकाणी उष्णतेची लाट येण्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. या काळात ओडिशामध्ये तुरळक ठिकाणी उष्णतेची तीव्र लाट येण्याची शक्यता आहे. पूर्व भारतातही तापमानात २ ते ३ अंशांनी वाढ होण्याचा अंदाज आहे. तर जम्मू-कशमीर, लडाख, गिलगिट, बाल्टिस्तान, मुझफ्फराबाद, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये येत्या दोन दिवसांत मुसळधार पावसाचा आणि हिमवृष्टीचा इशारा हवामान विभागानं दिला आहे.