March 20, 2025 2:32 PM March 20, 2025 2:32 PM
2
२०२४ हे आतापर्यंतचं सर्वात उष्ण वर्ष राहिल्याचा संयुक्त राष्ट्रांच्या हवामानविषयक संस्थेचा अहवाल
२०२४ हे आतापर्यंतचं सर्वात उष्ण वर्ष राहिल्याचं संयुक्त राष्ट्रांच्या हवामान शास्त्र संघटनेच्या वार्षिक अहवालात म्हटलं आहे. या वर्षात जागतिक तापमान १८५० ते १९०० या वर्षांमध्ये निर्धारित करण्यात आलेल्या आधार रेषेपेक्षा प्रथमच दीड अंश सेल्सिअसने अधिक नोंदवलं गेल्याचं यात म्हटलं आहे. २०२४ या वर्षात जगभरात नैसर्गिक आपत्तीमुळे सर्वात जास्त लोक विस्थापित झाले असून, सौदी अरेबियासह अनेक ठिकाणी उष्णतेची अभूतपूर्व लाट उसळल्याचं अहवालात म्हटलं आहे. हवामान बदलाचे हे संकेत पृथ्वी ग्रहाची जोखीम वाढवत असल्याच...