August 18, 2024 6:58 PM August 18, 2024 6:58 PM

views 11

आरोग्य कर्मचाऱ्यांवरील हल्ले रोखण्यासाठी कायदा आणण्याची भारतीय वैद्यकीय संघटनेची प्रधानमंत्र्यांकडे मागणी

कोलकात्याच्या महिला डॉक्टर बलात्कार आणि हत्या प्रकरणी भारतीय वैद्यकीय संघटनेनं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून आरोग्य सेवा क्षेत्रातल्या कर्मचाऱ्यांवर होणारे हल्ले रोखण्यासाठी कायदा आणण्याची मागणी केली आहे. सर्व रुग्णालयांमध्ये सुरक्षेसंबंधीचे नियम विमानतळांवरच्या नियमांइतके कडक करावेत, सर्व रुग्णालयं सुरक्षित क्षेत्रं म्हणून घोषित करावी आणि योग्य ती सुरक्षाव्यवस्था त्यांना पुरवली जावी, असंही या पत्रात म्हटलं आहे. बलात्कार आणि हत्या प्रकरणाची चौकशी सखोल आणि ठराविक वेळेत पूर्ण व्हावी, ...

August 18, 2024 10:45 AM August 18, 2024 10:45 AM

views 9

आरोग्यसेवा व्यावसायिकांच्या सुरक्षिततेसाठी केंद्र सरकार समिती स्थापन करणार

आरोग्य सेवेतील व्यावसायिकांच्या सुरक्षिततेसाठी सर्व संभाव्य उपाययोजना सुचवण्यासाठी केंद्र सरकारनं एक समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. निवासी डॉक्टर्सची संघटना आणि भारतीय वैदयकीय संघटनेसह आरोग्य क्षेत्रातल्या विविध भागधारकांनी डॉक्टरांच्या सुरक्षिततेविषयी चिंता व्यक्त केली होती, त्यानंतर सरकारनं हा निर्णय घेतला. राज्य सरकारांना या विषयानुरूप समितीसमोर सूचना मांडण्यास सुचित करण्यात आलं आहे. शुक्रवारी जारी केलेल्या सूचनेनुसार, सरकारी रुग्णालयांना आरोग्य सेवा कर्मचाऱ्यांवर झालेल्या शाब्दिक अत...