October 5, 2025 8:17 PM October 5, 2025 8:17 PM

views 35

कफ सिरपच्या गुणवत्तेवर आणि तर्कसंगत वापरावर उच्चस्तरीय बैठक

केंद्रीय आरोग्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली आज नवीदिल्लीत राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांच्या आरोग्य तसंच मुख्य सचिवांची बैठक झाली. कफ सिरपच्या गुणवत्तेवर आणि तर्कसंगत वापरावर या उच्चस्तरीय बैठकीत चर्चा झाली. सर्व औषध उत्पादकांनी सुधारित शेड्युल ‘एम’ चं काटेकोर पालन करणं आवश्यक असल्याचं आरोग्य सचिवांनी या बैठकीत अधोरेखित   केले. नियमांचे पालन न करणाऱ्या युनिट्सचे परवाने रद्द करावेत, असे निर्देशही त्यांनी दिले.   राज्यांना विशेषतः मुलांमध्ये कफ सिरपचा तर्कसंगत वापर करायचं आवाहन करण्यात आलं आहे.

October 5, 2025 3:27 PM October 5, 2025 3:27 PM

views 76

कफ सिरपच्या सेवनानं मुलांचे मृत्यू, आरोग्य मंत्रालयाने बोलावली बैठक

राजस्थान आणि मध्य प्रदेशमध्ये कफ सिरपच्या सेवनानं काही मुलांचे मृत्यू झाल्याच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सर्व राज्यांच्या आरोग्य सचिवांची बैठक बोलावली आहे. आज संध्याकाळी  चार वाजता आरोग्य मंत्रालयाच्या सचिवाच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार असून सर्व राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांचे मुख्य सचिव, आरोग्य सचिव यात सहभागी होणार आहेत. तसंच औषध नियंत्रक देखील सहभागी होतील. दूरदृश्यप्रणालीद्वारे होणाऱ्या या बैठकीत कफ सिरपचा गैरवापर तसंच औषधांची गुणवत्ता यावर चर्चा होणार आहे. ...

December 1, 2024 9:58 AM December 1, 2024 9:58 AM

views 8

साप चावण्याच्या सर्व घटनांची नोंद करण्याची केंद्राची सर्व राज्यांना सूचना

सर्पदंश आणि सर्पदंशामुळे होणारे  मृत्यू यांना राज्य सार्वजनिक आरोग्य कायद्यातल्या तरतुदीनुसार नोटिफायबल डिसीज म्हणजेच आजारांच्या अधिसूचिमध्ये समाविष्ट करावं, असं केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सर्व राज्यसरकारं आणि केंद्रशासित प्रदेशांना, सांगितलं आहे. विशेषतः शेतकरी आणि आदिवासींमध्ये सर्पदंशामुळे मृत्यू, विकृती आणि अपंगत्व येऊ शकतं. वर्ष २०३०पर्यंत सर्पदंशामुळे मृत्यूचं प्रमाण निम्म्याने कमी करण्याचं सरकारचं उद्दिष्ट आहे, त्यामुळे वर्ष २०३० पर्यंत सर्पदंश प्रतिबंध आणि नियंत्रणासाठी राष्ट्रीय कृती आ...

September 10, 2024 9:54 AM September 10, 2024 9:54 AM

views 9

देशात एका नागरिकाला एमपॉक्स क्ले़ड दोनची लागण

देशात एका नागरिकाला मंकीपॉक्स आजाराच्या एमपॉक्स क्ले़ड दोनची लागण झाली असल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे. या तरुण व्यक्तीनं मंकीपॉक्सचा प्रसार झालेल्या देशातून प्रवास केला असल्यानं त्याला हा संसर्ग झाला असल्याचं निष्पन्न झालं आहे. सध्या त्याला विलगीकरणात ठेवण्यात आलं असून, त्याची प्रकृती स्थिर असल्याचंही मंत्रालयानं म्हटलं आहे. सर्वसामान्य लोकांना कोणताही धोका असल्याचे कोणतेही संकेत नाहीत. सार्वजनिक आरोग्याला धोका उद्भवू नये यासाठी सर्वतोपरी खबरदारी घेतली जात असल्याचंही मंत्रा...