November 18, 2025 7:29 PM November 18, 2025 7:29 PM
4
प्रतिजैविक प्रतिकार हा सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने चिंतेचा विषय-जे.पी नड्डा
प्रतिजैविक प्रतिकार हा सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने चिंतेचा विषय असल्याचं केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जे.पी नड्डा यांनी म्हटलं आहे. प्रतिजैविक प्रतिरोध यासाठी राष्ट्रीय कृती योजनेचं दुसरी कृती योजनेचा आरंभ त्यांनी आज नवी दिल्लीत केला त्यावेळी ते बोलत होते. सामूहिक प्रयत्नांनी या संकटाला तोंड देता येईल असंही नड्डा म्हणाले. प्रतिजैविके प्रतिरोध म्हणजे रोगजंतू त्यांच्या निर्मूलनासाठी वापरण्यात येणाऱ्या औषधांना दाद देत नाहीत ही जगभरात वाढत चाललेली आरोग्य समस्या आहे.