October 29, 2024 11:15 AM October 29, 2024 11:15 AM

views 6

प्रधानमंत्री १२ हजार कोटींहून अधिक खर्चाच्या आरोग्यविषयक योजनांचा प्रारंभ करणार

प्रधानमंत्री नेरंद्र मोदी आज धन्वंतरी दिन आणि नवव्या आयुर्वेद दिनानिमित्त नवी दिल्ली इथं आरोग्याशी संबंधित जवळपास १२ हजार ८५० कोटी रुपयांच्या योजनांचा प्रारंभ करणार आहेत. ७० वर्षं आणि त्याहून अधिक वयाच्या ज्येष्ठ नागरिकांना आयुष्मान प्रधानमंत्री भारत जन आरोग्य योजनेत सामावून घेण्याच्या योजनेचीही ते आज सुरुवात करणार आहेत. यामुळे समाजाच्या सर्व वर्गातील ज्येष्ठ नागरिकांना आरोग्यविषयक सुविधा उपलब्ध होतील.   याशिवाय पंतप्रधानांच्या हस्ते आरोग्य सेवा आणखी सुधारण्यासाठी विविध आरोग्य संस्थांचं उद्...