July 10, 2024 9:18 AM

views 49

राज्यात १० नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयं सुरू करणार – वैद्यकीय शिक्षणंत्री हसन मुश्रीफ

२०२४-२५ या शैक्षणिक वर्षापासून राज्यात दहा नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयं सुरू करण्याचे प्रयत्न असल्याचं, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितलं आहे. मराठवाड्यात हिंगोली आणि जालन्यासह राज्यात १०० विद्यार्थी क्षमतेची ही महाविद्यालयं सुरु करण्यासाठी, राष्ट्रीय वैद्यक परिषदेकडे अर्ज देण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. या महाविद्यालयात अध्यापकांची पदं भरण्याची कार्यवाही राज्य लोकसेवा आयोगामार्फत सुरु असून, वैद्यकीय महाविद्यालयाची इमारत आणि संलग्नित रुग्णालय या संदर्भातली कार्यवाही पूर्ण ...

July 7, 2024 6:55 PM

views 54

कोल्हापूर : नागरी आरोग्यवर्धिनी केंद्रांतून गोरगरीबांना आरोग्य सेवा देण्याचं पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचं आवाहन

पंधराव्या वित्त आयोगातून उभारण्यात आलेल्या नागरी आरोग्यवर्धिनी केंद्रांतून शहरातल्या गोरगरीबांना चांगल्या आरोग्य सेवा सुविधा देण्याचं आवाहन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी आज कोल्हापुरात केलं. कोल्हापूर महापालिकेच्यावतीनं नव्यानं सुरू करण्यात आलेल्या तीन नागरी आरोग्यवर्धिनी केंद्रांचं उद्घाटन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते झालं. त्यावेळी ते बोलत होते.   या नागरी आरोग्यवर्धिनी केंद्रामार्फत नागरीकांवर मोफत औषधोपचार केला जाणार आहे. यामुळे खासगी दवाखान्यावर नागरिकांचा होणारा खर्च कमी होईल,अ...