October 12, 2024 2:04 PM October 12, 2024 2:04 PM

views 6

हरियाणातल्या नव्या सरकारचा शपथविधी १७ ऑक्टोबरला

हरियाणातल्या नव्या सरकारचा शपथविधी गुरुवारी १७ ऑक्टोबरला होणार आहे. मुख्यमंत्री नायब सिंग सैनी यांच्यासह काही मंत्री पंचकुलामध्ये पद आणि गोपनीयतेची शपथ घेतील. यावेळी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासह इतर राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित राहण्याची शक्यता आहे.   नॅशनल कॉन्फरन्सच्या नेतृत्त्वाखालच्या आघाडीनं काल जम्मू-काश्मिरमध्ये सत्ता स्थापन करण्यासाठी दावा सादर केला. नॅशनल कॉन्फरन्सच्या विधीमंडळ पक्षाचे नेते ओमर अब्दुल्ला यांनी काल नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी का...

October 8, 2024 8:50 PM October 8, 2024 8:50 PM

views 17

हरियाणात भाजपाला तर जम्मूकाश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेस आघाडीला बहुमत

जम्मू आणि काश्मीर तसंच हरियाणा विधानसभा निवडणूकीची मतमोजणी  आज झाली.    जम्मू काश्मीरमध्ये ९० विधानसभा मतदारसंघापैकी ४२ ठिकाणी नॅशनल कॉन्फरन्सचे उमेदवार विजयी झाले असून भाजपाचे उमेदवार २९ ठिकाणी विजयी झाले आहेत. काँग्रेस ६, पीडीपी ३ तर जेपीसी, सीपीएम आणि आपचे उमेदवार प्रत्येकी एका ठिकाणी विजयी झाले आहेत. सात ठिकाणी अपक्ष उमेदवारांनी विजय मिळवला आहे. माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला बडगाम आणि गंदेरबाल या दोन्ही मतदारसंघातून विजयी झाले आहेत.    हरियाणात ९० मतदारसंघांपैकी ४८ ठिकाणी भाजपा उम...

October 4, 2024 2:25 PM October 4, 2024 2:25 PM

views 11

हरयाणा विधानसभा निवडणुकीसाठीची पूर्वतयारी पूर्ण

हरयाणा विधानसभा निवडणुकीसाठीची पूर्वतयारी पूर्ण झाली आहे. हरयाणात ९० मतदारसंघांसाठी उद्या एकाच टप्प्यात निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी १ हजार ३१ उमेदवार रिंगणात आहेत. उद्या सकाळी सात ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदानाची वेळ असेल. राज्यातले २ कोटी ३ लाख ५४ हजारहून अधिक मतदार उमेदवारांचं भविष्य ठरवतील. या निवडणुकीसाठी एकूण २० हजार ६३२ मतदान केंद्र उभारण्यात आली आहेत.

September 16, 2024 7:55 PM September 16, 2024 7:55 PM

views 9

जम्मू काश्मीर आणि हरियाणा विधानसभा निवडणुकांसाठी प्रशासन सज्ज

जम्मू काश्मीर आणि हरियाणा विधानसभा निवडणुकांसाठी स्थानिक प्रशासन सज्ज होत आहे. जम्मू काश्मीरमधे मुख्य निवडणूक अधिकारी पी. के. पोल यांनी मतदारांसाठी विशेष जागृती अभियान सुरु केलं आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाचा स्वीप कार्यक्रम येत्या १८ सप्टेंबरपासून पूर्ण केंद्रशासित प्रदेशात राबवला जाणार आहे. या जागृती अभियानात मतदार मतदान करण्याची शपथ घेणार असून त्यांना मतदान प्रतिबद्धतेचं प्रमाणपत्र दिलं जाईल. जम्मू काश्मीरमधे येत्या १८ सप्टेंबरला पहिल्या टप्प्यातलं मतदान होणार आहे. २५ सप्टेंबरला दुसऱ्या टप्प्य...

August 16, 2024 7:29 PM August 16, 2024 7:29 PM

views 16

जम्मू-काश्मीरमध्ये तीन टप्प्यात आणि हरयाणामध्ये एका टप्प्यात विधानसभा निवडणूक

केंद्रीय निवडणूक आयोगानं जम्मू काश्मीर आणि हरयाणा या दोन राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम आज जाहीर केला. जम्मू काश्मीरमध्ये १८ सप्टेंबर,  २५ सप्टेंबर आणि १ ऑक्टोबर २०२४ अशा तीन टप्प्यात मतदान होईल. जम्मूमध्ये ४३ आणि काश्मीरमध्ये ४७ असे एकूण ९० मतदारसंघ आहेत. काश्मिरी पंडित आणि पीओके मधील विस्थापितांसाठी  नायब राज्यपालांकडून एकूण तीन जागांवर उमेदवार दिले जातील. त्यामुळे या राज्यात एकूण ९३ जागांसाठी मतदान होणार आहे.       हरयाणा विधानसभेच्या ९० जागांसाठी १ ऑक्टोबर रोजी मतदान हो...

August 12, 2024 1:51 PM August 12, 2024 1:51 PM

views 12

हरियाणात सप्टेंबरमध्ये महिलांसाठी पहिली जागतिक कबड्डी स्पर्धा

महिलांसाठीची पहिली जागतिक कबड्डी स्पर्धा येत्या सप्टेंबरमधे हरियाणात होणार असून, त्यात 15 देशांचे संघ सहभागी होणार आहेत. जागतिक स्तरावर कबड्डी खेळाला महत्त्व प्राप्त व्हावं, या खेळाचा ऑलिंपिक स्पर्धेमध्ये समावेश व्हावा आणि 2036 मध्ये भारतामध्ये ऑलिंपिक स्पर्धांचं आयोजन करण्याच्या दृष्टीने भारताच्या दाव्याला पाठबळ मिळावं, या उद्देशाने भारतात हरियाणामध्ये या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे, या स्पर्धांमध्ये इंग्लंड, पोलंड, अर्जेंटिना, इटली आदी देशांच्या संघांनी या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी उत्सुक...

July 20, 2024 8:37 PM July 20, 2024 8:37 PM

views 31

हरयाणाचे काँग्रेस आमदार सुरेंद्र पवार यांना ईडीकडून अटक

हरयाणामधले कॉँग्रेसचे आमदार सुरेंद्र पवार यांना आज सक्तवसुली संचालनालयाने अटक केली. त्यांच्यावर यमुनानगर भागात अवैध खाणकाम आणि आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप आहे. त्यांना अंबाला जिल्हा आणि सत्र न्यायालयासमोर हजर करण्यात आलं. सक्तवसुली संचालनालयाने १४ दिवसांच्या पोलिस कोठडीची मागणी केली होती, मात्र न्यायालयाने त्यांना नऊ दिवसांची पोलिस कोठडी दिली आहे.