May 5, 2025 8:17 PM May 5, 2025 8:17 PM

views 6

हरियाणाला एक थेंबही जास्त पाणी नाही, पंजाब सरकारचा निर्णय

हरियाणाला त्यांच्या वाट्यापेक्षा एक थेंबही जास्त पाणी देणार नाही असा निर्णय पंजाब सरकारने घेतला आहे. पंजाब विधानसभेच्या आजच्या विशेष अधिवेशनात हा निर्णय झाला. सध्या पंजाबने चार हजार क्युसेक्स पाणी हरियाणाला सो़डलं आहे, ते सुरू राहील असं पंजाब सरकारने सांगितलं आहे. भाक्रा बियास व्यवस्थापन मंडळाची पुनर्रचना करण्याची मागणीही पंजाब विधानसभेनं आज केली. तसंच रावी, सतलज, बियास या नद्यांच्या पाणी वाटपाबाबत नवीन करार करण्याचा निर्णय घेण्यात आला.