November 18, 2024 8:22 PM November 18, 2024 8:22 PM

views 4

राज्यात डीएपी खताचा तुटवडा नसून पुरेसा साठा उपलब्ध-हरियाणाचे मुख्यमंत्री नायाब सिंह सैनी

राज्यात डीएपी खताचा तुटवडा नसून पुरेसा साठा उपलब्ध आहे, असं हरियाणाचे मुख्यमंत्री नायाब सिंह सैनी यांनी आज विधानसभेत सांगितलं. राज्यातल्या प्राथमिक कृषी पतसंस्थांमधे किती खत उपलब्ध आहे, याची आकडेवारीही सरकारकडे असल्याचं सैनी यांनी सांगितलं. नोव्हेंबर महिन्यात १ लाख दहा हजार २०० मेट्रिक टन डीएपी खताचं वाटप केलं असून खताचा तुटवडा ही केवळ अफवा आहे, असं ते म्हणाले.