September 9, 2024 6:22 PM September 9, 2024 6:22 PM

views 19

हरियाणातल्या आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आम आदमी पार्टीची २० उमेदवारांची पहिली यादी जाहीर

हरियाणातल्या आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आम आदमी पार्टीने वीस उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. यात बिजेंद्र हुड्डा हे रोहतक इथून तर इंदू शर्मा भिवानी मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. उचना कलान मतदारसंघातून पवन फौजी आणि घरौंदा मतदारसंघातून जयपाल शर्मा निवडणूक लढवणार आहेत.

September 9, 2024 2:45 PM September 9, 2024 2:45 PM

views 9

हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसची ९ उमेदवारांची यादी जाहीर

हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने ९ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. त्यात माजी खासदार बृजेंद्रसिंग यांना उचनाकलान मतदारसंघातून तर मोहित ग्रोवर यांना गुरुग्राममधून उमेदवारी देण्यात आली आहे. ९० जागांपैकी ३२ ठिकाणचे उमेदवार काँग्रेसने जाहीर केले आहेत. हरियाणा विधानसभेसाठी एकाच टप्प्यात येत्या ५ ऑक्टोबरला मतदान होणार आहे. 

August 31, 2024 7:58 PM August 31, 2024 7:58 PM

views 8

हरियाणा आणि जम्मू काश्मिर विधानसभेसाठी ४ ऐवजी ८ ऑक्टोबरला मतमोजणी

केंद्रीय निवडणूक आयोगानं हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या मतदानाची तारीख बदलली असून हरियाणात आता १ ऑक्टोबर ऐवजी ५ ऑक्टोबरला मतदान होणार आहे. बिष्णोई समाजाच्या असोज अमावस्या उत्सावामुळे ही तारीख बदलण्यात आल्याचं आयोगानं म्हटलं आहे. अनेक राष्ट्रीय आणि प्रादेशिक पक्षांनी ही तारीख बदलण्याची विनंती केली होती. याबरोबरच जम्मू काश्मीर आणि हरियाणा विधानसभा निवडणुकीची मतमोजणी आता ४ ऑक्टोबर ऐवजी  ८ ऑक्टोबरला करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे.