September 10, 2024 7:36 PM September 10, 2024 7:36 PM

views 9

हरयाणा विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची २१ उमेदवारांची यादी जाहीर

आगामी हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठी भाजपनं आज २१ उमेदवारांची आणखी एक यादी जाहीर केली आहे. जुलाना विधानसभा मतदारसंघातून कॅप्टन योगेश बैरागी यांना ऑलिंपिक खेळाडू विनेश फोगट यांच्या विरुद्ध  उमेदवारी दिली आहे. कृष्णा गहलावत,  राई  मतदारसंघातून निवडणूक लढवतील.  बिमला चौधरी पतौडी मतदारसंघातून तर प्रदीप सांगवान बरोदा विधानसभा मतदारसंघातून लढणार आहेत. फिरोजपूर झिरका मतदारसंघातून नसीम अहमद यांना रिंगणात उतरवण्यात आलं असून पुनहाना विधानसभा मतदारसंघातून एराज खान हे पक्षाचे उमेदवार आहेत. यापूर्वी भाजपनं एक...

September 7, 2024 8:14 PM September 7, 2024 8:14 PM

views 15

हरयाणा विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसची पहिली उमेदवारी यादी जाहीर

हरयाणा विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसनं पहिली उमेदवारी जाहीर करताच पक्षात बंडखोरीला सुरुवात झाली आहे. काँग्रेस नेते राजेश जून यांनी, उमेदवारी न मिळाल्यामुळे पक्षाच्या सर्व पदांचा राजीनामा देत अपक्ष निवडणुक लढवण्याची घोषणा केली आहे. तीनवेळा आमदार म्हणून निवडून आलेले काँग्रेसचे नेते रामकृष्ण फौजी यांनी तिकिट न मिळण्याच्या शक्यतेमुळे आज कार्यकर्त्यांची पंचायत आयोजित केली होती. आपल्याला उमेदवारी मिळावी, या मागणीसाठी उद्या कार्यकर्त्यांसह दिल्लीकडे कूच करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. 

September 7, 2024 12:25 PM September 7, 2024 12:25 PM

views 9

हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसनं 31 उमेदवारांची यादी जाहीर

हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसनं 31 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री भूपिंदर सिंग हुड्डा, गढ़ी सांपला किलोई मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. प्रदेश काँग्रेसचे प्रमुख उदय भान यांना होडलमधून उमेदवारी देण्यात आली आहे. काँग्रेसमध्ये काल दाखल झालेल्या कुस्तीपटू विनेश फोगटला जुलाना इथून तिकीट मिळालं आहे. राज्याच्या माजी मंत्री गीता भुक्कल या झज्जरमधून निवडणूक लढवणार आहेत. विद्यमान आमदार चिरंजीव राव यांना पुन्हा रेवाडीतून तिकीट देण्यात आलं आहे. हरियाणा...

September 5, 2024 1:24 PM September 5, 2024 1:24 PM

views 7

हरियाणा विधानसभा निवडणुकीची तसंच जम्मूकाश्मीर विधानसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्याची अधिसूचना जारी

केंद्रीय निवडणूक आयोगानं आज जम्मू काश्मीरच्या तिसऱ्या आणि अंतिम टप्प्यातल्या निवडणुकीसाठी तसंच हरयाणा विधानसभा निवडणुकीसाठी अधिसूचना जारी केली.   जम्मू काश्मीरचा तिसरा टप्पा आणि हरयाणा विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची अंतिम तारीख १२ सप्टेंबर असून १६ तारखेपर्यंत उमेदवार आपला अर्ज मागे घेऊन शकतील. तर जम्मू काश्मीरच्या दुसऱ्या टप्प्यातल्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस आहे. जम्मू काश्मीर मध्ये १८ सप्टेंबर,   २५ सप्टेंबर आणि १ ऑक्टोबर अशा तीन टप्प्यात मतदान होणार आहे. दरम्यान निव...