October 9, 2024 8:11 PM October 9, 2024 8:11 PM
6
हरियाणामध्ये भाजपाकडून सत्तास्थापनेसाठी तयारी सुरू
हरियाणामध्ये निवडणुकीत मिळालेल्या विजयानंतर भाजपानं सरकार स्थापन करण्यासाठी जोरदार तयारी सुरु केली आहे. प्रचारादरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी नायब सिंग सैनी यांच्या नावाची मुख्यमंत्री पदासाठी शिफारस केली होती. याबाबत बातमीदारांनी विचारलं असता, तो निर्णय पक्ष आणि संसदीय मंडळ घेईल, असं सैनी यांनी सांगितलं.