November 10, 2025 1:24 PM November 10, 2025 1:24 PM

views 17

हरियाणातल्या फरीदाबादमध्ये स्फोटकं, शस्त्रास्त्रं आणि दारूगोळा जप्त

जम्मू-काश्मीर आणि हरियाणा पोलिसांच्या पथकानं हरियाणातल्या फरीदाबादमधून मोठ्या प्रमाणावर स्फोटकं, शस्त्रास्त्रं आणि दारूगोळा जप्त केला. या प्रकरणी एका संशयिताला ताब्यात घेतल्याची माहिती फरीदाबादचे पोलीस आयुक्त सतेंदर कुमार गुप्ता यांनी दिली. १ असॉल्ट रायफल, तीन मॅगझीन्स, आठ जिवंत काडतुसांसह एक पिस्तूल, २ रिकामी काडतुसं, दोन अतिरिक्त मगॅझीन्स, तसंच ८ मोठ्या सूटकेस, ४ लहान सूटकेस आणि एका बादलीत ठेवलेले सुमारे साडेतीनशे किलो ज्वालाग्रही पदार्थ जप्त केल्याचंही त्यांनी सांगितलं.

October 21, 2025 3:26 PM October 21, 2025 3:26 PM

views 19

गुजरात आणि हरियाणाला १५ व्या वित्त आयोगाअंतर्गत ७३० कोटी रुपयांचं अनुदान

१५ व्या वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार केंद्रसरकारने गुजरात आणि हरियाणाला ७३० कोटी रुपयांचं अनुदान जारी केलं.  ग्रामीण स्वराज्य संस्थांच्या सशक्तीकरणासाठी या दोन्ही राज्याना आर्थिक सहाय्य करण्याची गरज वित्त आयोगाने वर्तवली होती. यापैकी  ५२२ कोटी रुपयांचा दुसरा हप्ता आणि पहिल्या हप्त्यापैकी १३ कोटी रुपये गुजराथकडे वर्ग करण्यात आले आहेत. तर हरयाणाला  २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठीचा १९५ कोटी रुपयांचा पहिला हप्ता देण्यात आला आहे.

May 19, 2025 8:01 PM May 19, 2025 8:01 PM

views 20

हेरगिरीच्या आरोपाखाली पंजाब आणि हरयाणातून तीघांना अटक

हेरगिरी करण्याचा प्रयत्न हाणून पाडत पंजाब पोलिसांनी दोन जणांना अटक केली आहे. हे दोघं ऑपरेशन सिंदूर, भारतीय लष्करांच्या हालचाली, पंजाब, हिमाचल प्रदेश आणि जम्मू काश्मीरमधली महत्त्वाची ठिकाणं यांची माहिती आयएसआय या पाकिस्तानी गुप्तचर संस्थेला देत होते, असं पोलीसांनी सांगितलं. आरोपींचे मोबाईल फोन तपासले असता त्यांनी गुप्त माहिती पाकिस्तानला पुरवल्याचं उघड झालं आहे. पोलिसांनी आरोपींकडून तीन मोबाईल आणि जिवंत काडतूसं जप्त केली आहेत.    हरियाणामधल्या नुह जिल्ह्यातही पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या...

April 30, 2025 1:17 PM April 30, 2025 1:17 PM

views 17

हरयाणा पंजाबचं पाणी हिसकावण्याचा प्रयत्न करत असल्याचा पंजाबचा आरोप

हरयाणा पंजाबचं पाणी हिसकावण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत सिंह मान यांनी केला आहे. पंजाबमध्ये पाणीसाठा कमी असूनही माणुसकीच्या दृष्टिकोनातून त्यांनी हरयाणाला आधीच ४ हजार क्युसेक पाणी दिलं आहे. मात्र, आता आपल्या राज्यात इतर राज्यांना देण्यासाठी पुरेसा पाणीसाठा नसल्याचं मान एका निवेदनाद्वारे म्हणाले. केंद्रीय रेल्वे आणि अन्न प्रक्रिया राज्यमंत्री रवनीत सिंह बिट्टू यांनी मान यांच्यावर टीका केली आहे. एकिकडे देश पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाचा सामना करत असताना मान यांनी हरयाणा...

April 13, 2025 1:14 PM April 13, 2025 1:14 PM

views 10

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या हरियाणाच्या दौऱ्यावर

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या हरियाणाला भेट देणार आहेत. सर्वप्रथम ते हिसार ते अयोध्या या नव्यानं सुरू होणाऱ्या विमान उड्डाण सेवेला हिरवा झेंडा दाखवतील आणि हिसार विमानतळाच्या नवीन टर्मिनल इमारतीची पायाभरणी करतील. हिसार इथं ते एका जाहीर सभेला संबोधित करणार आहेत. त्यानंतर, यमुनानगर इथं दीनबंधू छोटूराम औष्णिक वीज केंद्राच्या 800 मेगावॅट आधुनिक औष्णिक वीज प्रकल्पाची ते पायाभरणी करतील. या प्रकल्पामुळे हरियाणात गावोगावी अखंडित वीजपुरवठा करण्याच्या कामाला चालना मिळणार आहे.  भारतमाला परियोजनेअंतर्गत सु...

March 7, 2025 7:55 PM March 7, 2025 7:55 PM

views 15

भारतीय हवाई दलाचं जग्वार विमान हरियाणातल्या अंबाला इथं कोसळलं

भारतीय हवाई दलाचं एक जग्वार विमान आज हरियाणातल्या अंबाला इथं कोसळलं. नियमित प्रशिक्षण उड्डाणादरम्यान तांत्रिक अडचणींमुळे हे विमान कोसळल्याचं हवाई दलानं म्हटलं आहे. वैमानिकानं या विमानातून बाहेर पडण्यापूर्वी ते लोकवस्तीच्या भागातून सुरक्षित बाहेर नेलं होतं. या दुर्घटनेच्या कारणांच्या चौकशीचे आदेश हवाई दलानं दिले आहेत.

December 29, 2024 7:43 PM December 29, 2024 7:43 PM

views 17

पंजाब हरयाणा आणि राजस्थानमध्ये येत्या दोन-तीन दिवसात दाट धुक्याचा हवामान विभागाचा अंदाज

पंजाब हरयाणा आणि राजस्थानमध्ये येते दोन ते तीन दिवस दाट ते अतिदाट धुक्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. या भागात तसंच चंदीगढमध्येही थंडीची लाट असेल. हिमाचल, उत्तरप्रदेश, आसाम, मेघालय, नागालँड, मणीपूर, मिझोराम आणि त्रिपुरामध्येही रात्री उशीरा ते पहाटेपर्यंत धुके असेल. येत्या तीनचार दिवस उत्तर प्रदेशात किमान तापमान चार ते सहा अंश सेल्सिअसने तर पंजाब ,हरयाणा, दिल्ली, राजस्थानमध्ये ते तीन ते चार अंश सेल्सिअसने घसरण्याची शक्यता आहे. पश्चिम हिमालय प्रदेशात बर्फवृष्टीची शक्यता आहे.

December 20, 2024 3:05 PM December 20, 2024 3:05 PM

views 18

हरियाणाचे माजी मुख्यमंत्री ओमप्रकाश चौटाला यांचं निधन

हरियाणाचे माजी मुख्यमंत्री तसंच भारतीय राष्ट्रीय लोक दलाचे ज्येष्ठ नेते ओम प्रकाश चौटाला यांचं आज दुपारी गुरुग्राम इथं निधन झालं. ते ८९ वर्षांचे होते. ५ वेळा हरियाणाचं मुख्यमंत्रीपद भूषवलेले ओम प्रकाश चौटाला माजी उप प्रधानमंत्री देवीलाल चौटाला यांचे सुपुत्र होते. हृदय विकाराचा झटका बसल्यानंतर त्यांना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पण त्यांचे प्राण वाचू शकले नाहीत.

November 17, 2024 10:50 AM November 17, 2024 10:50 AM

views 11

राष्ट्रीय वरिष्ठ पुरुष हॉकी अजिंक्यपद अंतिम स्पर्धेत ओडिशाची हरियाणावर मात

राष्ट्रीय वरिष्ठ पुरुष हॉकी अजिंक्यपद स्पर्धेत ओडिशाच्या शिलानंद लाक्रा यानं हॅट्ट्रिक साधत काल चेन्नई इथं झालेल्या अंतिम स्पर्धेत हरियाणाचा 5-1 असा पराभव करूंन ओडिशाला विजय मिळवून दिला. शिलानंदने तीन गोल केले, तर रजत आकाश तिर्की यानं सुरुवातीला मिळालेल्या संधीचं सोनं करून ओडिशाला आघाडी मिळवून दिली. त्यानंतर तिसऱ्या सत्रात प्रताप लाक्राने पेनल्टी स्ट्रोकमध्ये बदल करत ह्या आघाडीला बळकटी दिली. चौथ्या सत्रात शिलानंद ओडिशासाठी अत्यंत महत्वाचा ठरला. हरियाणाचा एकमेव गोल जोगिंदर सिंगने केला. दरम्यान उत...

October 19, 2024 2:48 PM October 19, 2024 2:48 PM

views 13

‘हरियाणा, महाराष्ट्रात भाजपने क्रीमीलेअर आणि अनुसूचित जातींमधील वर्गीकरणाचा चुकीचा निर्णय लागू केला’

हरियाणा आणि महाराष्ट्रात भाजपने सर्वोच्च न्यायालयाचा क्रीमीलेअर आणि अनुसूचित जातींमधील वर्गीकरणाचा चुकीचा निर्णय लागू केल्याचं वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे. आपल्या  ट्विटमध्ये त्यांनी म्हटलं आहे की, भाजप आणि काँग्रेस हे दोन्ही एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. दोन्ही पक्षांना अनुसूचित जातींमध्ये विभागून त्यांचे एक होणे थांबवायचे आहे. निवडणूकीच्या काळात लोकांमध्ये फूट पाडून भाजप आणि काँग्रेसला राजकीय लाभ घ्यायचा आहे. असंही ते म्हणाले.