June 24, 2025 12:56 PM June 24, 2025 12:56 PM

views 13

हार्वर्ड विद्यापीठात परदेशी विद्यार्थ्यांच्या प्रवेशासंदर्भातला तात्पुरता आदेश जारी

अमेरिकेतल्या बोस्टन इथले जिल्हा न्यायाधीश ॲलिसन बरोज यांनी हार्वर्ड विद्यापीठात परदेशी विद्यार्थ्यांच्या प्रवेशासंदर्भातला दुसरा तात्पुरता आदेश जारी केला आहे. या आदेशानुसार परदेशी विद्यार्थ्यांना, यासंदर्भातला कायदेशीर खटला सुरू असेपर्यंत हार्वर्डमध्ये शिक्षण घेण्यासाठी अमेरिकेत प्रवास करण्याची परवानगी दिली आहे. या आदेशानं हार्वर्ड विद्यापीठात आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यापासून रोखण्याचा ट्रम्प प्रशासनाचा आणखी एक प्रयत्न रोखला गेला आहे.

June 5, 2025 1:35 PM June 5, 2025 1:35 PM

views 11

अमेरिकेतल्या हार्वर्ड विद्यापीठात परदेशी विद्यार्थ्यांच्या व्हिसावर निर्बंध घालणारी अधिसूचना जारी

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हार्वर्ड विद्यापीठातील परदेशी विद्यार्थ्यांच्या व्हिसावर निर्बंध घालणारी अधिसूचना जारी केली आहे. या अधिसूचनेअंतर्गत व्हिसावरील तात्पुरत्या सहा महिन्यांचा निलंबनाची आणि आवश्यकता वाटल्यास निलंबनाचा कालावधी वाढवण्याची तरतूद आहे. या अधिसूचनेअंतर्गत ट्रम्प प्रशासानानं आपल्या परराष्ट्र विभागाला या अधिसूचनेतील निकषांच्या आधारे हार्वर्डच्या कोणत्याही विद्यमान विद्यार्थ्यांचे शैक्षणिक आणि एक्सचेंज व्हिसा रद्द होऊ शकणार असतील तर ते रद्द करण्याचा विचार करावा अस...

April 16, 2025 10:15 AM April 16, 2025 10:15 AM

views 13

हावर्ड विद्यापिठाच्या अनुदानावर विपरित परिणाम होण्याचा अमेरिकेचा इशारा

अमेरिकी सरकारच्या मागण्या मान्य न केल्यास हावर्ड विद्यापिठाला देण्यात येणाऱ्या अनुदानावर विपरित परिणाम होईल असा इशारा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी दिला आहे. ट्रंप प्रशासनाने या संस्थेसाठी 2 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त निधी गोठवण्याचा इशारा दिला आहे. अमेरिकेतील सर्वात जुन्या विद्यापीठाला भरती, प्रवेश आणि अध्यापन पद्धतींमध्ये बदल करण्याची मागणी प्रशासनानं केली आहे. दरम्यान हार्वर्ड विद्यापीठानं प्रशासनाच्या मागण्या नाकारल्या असून व्हाईट हाऊसवर त्यांच्या संस्थेवर नियंत्रण ठेवण्याचा प्रय...