June 8, 2025 7:02 PM June 8, 2025 7:02 PM

views 139

राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोग वस्तुनिष्ठ उत्तरं देत नसल्याचा काँग्रेसचा आरोप

राज्यातल्या विधानसभा निवडणुकीत गैरप्रकार झाल्याच्या राहुल गांधी यांच्या आरोपांवर निवडणूक आयोग वस्तुनिष्ठ उत्तरं का देत नाही असा सवाल काँग्रेसने केला आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आज मुंबईत पत्रकार परिषदेत सांगितलं, की राहुल गांधी यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना निवडणूक आयोगाने उत्तरं दिली पाहिजेत परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यासंदर्भात लेख लिहून जनतेची दिशाभूल केली आहे. राज्य विधानसभा निवडणुकीच्या वेळचे मुख्य निवडणूक अधिकारी एस चोकलिंगम आणि किरण कुलकर्णी यांची ...

April 7, 2025 6:48 PM April 7, 2025 6:48 PM

views 10

कच्च्या तेलाचे दर घसरल्याचा फायदा सर्वसामान्य जनतेला करुन द्या-हर्षवर्धन सपकाळ

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर घसरल्याचा फायदा सर्वसामान्य जनतेला करुन द्या. पेट्रोल-डिझेलवरचे कर कमी करुन पेट्रोल ५१ रुपये आणि डिझेल ४१ रुपये प्रति लिटरने द्या, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आज मुंबईत वार्ताहर परिषदेत केली.   संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या काळात पेट्रोलवर प्रति लिटर साडे ९ रुपये आणि डिझेलवर साडे ३ रुपये उत्पादन शुल्क होते. राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारनं हा दर वाढवून लिटरमागे ३२ रुपये केल्याचा दावा त्यांनी केला.  डॉ. मनमोहनसिंह प्रधानमंत...