August 11, 2024 7:31 PM August 11, 2024 7:31 PM

views 4

घरोघरी तिरंगा उपक्रमांतर्गत पनवेल महापालिकेचं तिरंगा मॅरेथॉनचं आयोजन

घरोघरी तिरंगा उपक्रमांतर्गत पनवेल महापालिकेनं आज तिरंगा मॅरेथॉनचं आयोजन केलं होतं. विद्यार्थी, नागरिक,  महानगरपालिका तसंच सुरक्षा विभागाचे अधिकारी कर्मचारी आणि स्वच्छतादूत मोठ्या संख्येनं या मॅरेथॉनमध्ये सहभागी झाले होते. पनवेल महानगरपालिकेच्या मुख्यालयापासून सुरू झालेल्या या मॅरेथॉनची वडाळे तलाव इथं सांगता झाली.  घरोघरी तिरंगा उपक्रमांतर्गत पनवेल महापालिकेनं बचतगटांचा तिरंगा मेळावा, देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम, बाइक आणि सायकल रॅलीसारख्या उपक्रमांचे नियोजन केले गेले असल्याची माहिती महापालिकेचे ...