August 12, 2025 9:28 AM

views 67

हर घर तिरंगा चित्रपट महोत्सवाला प्रारंभ

भारताच्या स्वातंत्र्यलढ्याच्या कथा आणि एकतेचं महत्त्व सांगणाऱ्या चित्रपटांच्या हर घर तिरंगा चित्रपट महोत्सवाला काल दिल्लीसह मुंबई, पुणे आणि चेन्नई इथं प्रारंभ झाला. राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळानं तीन दिवसांचा हा महोत्सव आयोजित केला आहे. मुंबईत या महोत्सवाचं उद्घाटन माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव संजय जाजू यांच्या हस्ते झालं.

August 9, 2024 8:19 PM

views 54

हर घर तिरंगा अभियानाला राज्यात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रारंभ

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा हस्ते आज मुंबईत ऑगस्ट क्रांती मैदानावर घरोघरी तिरंगा अभियानाचा प्रारंभ झाला. लाखो स्‍वातंत्र्यसैनिकांच्‍या त्‍याग आणि बलिदानातून देशाला स्‍वातंत्र्य मिळालं. त्यांच्या त्यागाची आणि बलिदानाची जाणीव तरुणांना व्हावी आणि त्‍यांच्‍यात राष्‍ट्रीयत्‍वाची भावना रूजावी, यासाठी 'घरोघरी तिरंगा अभियान' प्रेरणादायी ठरेल, असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. या अभियानात मोठ्या संख्येनं सहभागी व्हावं असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलं. ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिं...

August 9, 2024 8:05 PM

views 60

हर घर तिरंगा अभियानाला देशभरात प्रारंभ/ ऑगस्ट क्रांतिदिनानिमित्त स्वातंत्र्य सैनिकांना देशाची आदरांजली

९ ऑगस्ट या क्रांती दिनानिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्या सैनिकांना आदरांजली वाहिली असून आजपासून हर घर तिरंगा अभियानात सहभागी होण्याचं आवाहन देशवासियांना केलं आहे. आज ९ ऑगस्ट म्हणजे क्रांती दिनापासून ते १५ ऑगस्ट अर्थात स्वातंत्र्य दिनापर्यंत देशभरात हर घर तिरंगा अर्थात घरोघरी तिरंगा अभियान राबवण्यात येणार आहे. या काळात नागरिकांनी आपल्या घरावर डौलाने तिरंगा फडकवावा आणि त्याबरोबर सेल्फी घेऊन तो फोटो हर घर तिरंगा या संकेतस्थळावर अपलोड करावा, असं आवाहन केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गज...