August 14, 2024 11:41 AM August 14, 2024 11:41 AM
6
मुंबई महानगरपालिकेत प्रभाग स्तरावर ‘तिरंगा यात्रा’
मुंबई महानगरपालिकेत प्रभाग स्तरावर ‘तिरंगा यात्रा’ काढण्यात आली. महानगरपालिका मुख्यालय ते गेट वे ऑफ इंडियापर्यंत निघालेल्या तिरंगा यात्रेत, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर सहभागी झाले होते. शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनीही ठिकठिकाणच्या तिरंगा यात्रांमध्ये सहभाग नोंदवला. नागपूर इथं काल घेतलेल्या तिरंगा मॅरेथॉनमध्ये नागरीक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते.