August 14, 2025 8:10 PM August 14, 2025 8:10 PM

views 6

स्वातंत्र्य दिनानिमित्त देशभरात ‘हर घर तिरंगा’ मोहीम

भारताच्या एकोणऐंशीव्या स्वातंत्र्य दिनानिमित्त देशभरात विविध राज्यांमध्ये हर घर तिरंगा मोहीम राबवण्यात येत आहे. चेन्नईजवळ आवडी इथं माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉक्टर. एल. मुरुगन यांनी तिरंगा रॅलीला संबोधित केलं. केरळमध्ये तिरुवनंतपुरम इथे रेल्वे पोलीस दलानं मोटारसायकल रॅलीचं आयोजन केलं. छत्तीसगडची राजधानी रायपूर इथं मुख्यमंत्री विष्णू देव साय यांच्या उपस्थितीत पदयात्रा पार पडली. बिहारमध्ये समस्तीपूर इथे केंद्रीय गृहराज्य मंत्री नित्यानंद राय यांच्या नेतृत्वात तिरंगा पदयात्रा काढण्यात आली. लडा...

August 13, 2025 2:55 PM August 13, 2025 2:55 PM

views 9

देशातल्या २१० पंचायत प्रतिनिधींना नवी दिल्लीत होणाऱ्या स्वातंत्र्यदिन सोहळ्याचं विशेष आमंत्रण

देशातल्या २८ राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशातल्या मिळून २१० पंचायत प्रतिनिधींना नवी दिल्लीत होणाऱ्या यंदाच्या स्वातंत्र्यदिन सोहळ्यात सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. आपापल्या गावात पायाभूत सुविधा, सार्वजनिक सेवा, आणि सामूहिक उपक्रम राबवून सुधारणा घडवणाऱ्या सरपंचांना विशेष पाहुणे म्हणून आमंत्रण देण्यात आलं आहे.   यात महिला प्रतिनिधींची संख्या लक्षणीय आहे. हर घर नल जल योजना, प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजना आणि इंद्रधनुष अभियानात या प्रतिनिधींनी भरीव कार्य केलं असल्याचं पंचायती राज मंत्रालयानं...

August 13, 2025 1:26 PM August 13, 2025 1:26 PM

views 14

एकोणऐंशीव्या स्वातंत्र्यदिन सोहळ्यासाठी देशभर तयारी सुरु

स्वातंत्र्यदिन अवघ्या दोन दिवसांवर आला असून देशात आणि देशाबाहेरही त्याची जय्यत तयारी सुरू आहे. विविध ठिकाणी अनेक कार्यक्रम आयोजित केली असून संवेदनशील ठिकाणी कडक सुरक्षाव्यवस्था तैनात करण्यात आली आहे.   हर घर तिरंगा अभियानांतर्गत आजपासून पुढचे तीन दिवस आपल्या घरावर तिरंगा ध्वज फडकावण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी त्यांच्या निवासस्थानी तिरंगा फडकावून या अभियानात सहभाग घेतला. या अभियानाला आता लोकचळवळीचं स्वरूप प्राप्त झालं असून यामुळे देशात एकतेचा संदेश जात असल्...

August 13, 2025 1:14 PM August 13, 2025 1:14 PM

views 2

आजपासून पुढचे तीन दिवस प्रत्येक घरी ध्वज फडकावण्याचं आव्हान

हर घर तिरंगा अभियानाअंतर्गत आजपासून पुढचे तीन दिवस आपल्या घरावर तिरंगा ध्वज फडकावण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी त्यांच्या निवासस्थानी तिरंगा फडकावून या अभियानात सहभाग घेतला.     हे अभियान आता लोकचळवळ बनली असून, ज्यामुळे देशात एकतेचा संदेश प्रसारित होत असल्याचं शहा यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात नमूद केलं.

August 12, 2025 3:32 PM August 12, 2025 3:32 PM

views 18

‘हर घर तिरंगा’ अभियानानिमित्त राज्यात विविध कार्यक्रम

देशाच्या एकतेचं निदर्शक असलेल्या हर घर तिरंगा अभियानानिमित्त सर्वत्र विविध कार्यक्रम होत आहेत. ठिकठिकाणी तिरंगा ध्वज घेऊन पदयात्रा काढण्यात येत आहेत तसंच नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले जात आहेत.   पालघर जिल्ह्यात वसई विरार महानगरपालिका क्षेत्रात या अभियानाअंतर्गत पालिकेच्या क्रीडा विभागानं तिरंगा दौड आयोजित केली होती. यात शालेय विद्यार्थी, धावपटूंनी भाग घेतला. यावेळी ३० फूट लांबीचा तिरंगा ध्वज घेऊन विद्यार्थी आणि उपस्थितांनी देशभक्तीपर घोषणा दिल्या. याखेरीज तिरंगा ध्वज, राष्ट्रीय स्वातंत्र्य दि...

August 11, 2025 8:06 PM August 11, 2025 8:06 PM

views 9

‘हर घर तिरंगा’ मोहिमेत सहभागी होण्याचं आवाहन

स्वातंत्र्य दिनानिमित्त देशभरात आयोजित केलेल्या हर घर तिरंगा या मोहिमेत देशात आणि परदेशात राहणाऱ्या प्रत्येक भारतीयाने सहभागी व्हावं असं आवाहन केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी आज केलं. ते आज नवी दिल्ली इथे पत्रकार परिषदेत बोलत होते. देशभरातले ५ लाखांहून अधिक स्वयंसेवक या मोहिमेत सहभागी होत असल्याचंही शेखावत यावेळी म्हणाले. हर घर तिरंगा मोहिमेअंतर्गत घर तिरंगा हर घर स्वच्छता, प्रश्नमंजुषा, पत्रलेखन, राखी बनवणे अशा विविध स्पर्धांचाही समावेश आहे.

August 11, 2025 6:52 PM August 11, 2025 6:52 PM

views 10

राज्यात हर घर तिरंगा मोहिमेंतर्गत विविध उपक्रम

येत्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने राज्यभरात हरघर तिरंगा या मोहिमेसह अन्य उपक्रम राबवण्यात येत आहेत.    माहिती आणि प्रसारण मंत्रालय आणि राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात येणारा देशभक्तीपर चित्रपटांचा महोत्सव आजपासून मुंबई तसंच नवी दिल्ली इथे सुरू झाला. भारतीय चित्रपट संग्रहालयाच्या सभागृहात या महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं असून या महोत्सवाला निःशुल्क प्रवेश देण्यात येणार आहे. येत्या १३ तारखेपर्यंत हा महोत्सव चालणार असून या महोत्सवाचं उद्दिष्ट राष्ट्रभक्त...

August 11, 2025 5:52 PM August 11, 2025 5:52 PM

views 18

वाशीममध्ये भटक्या समाजाच्या नागरिकांनी पालावर फडकावला तिरंगा

येत्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने देशभरात हर घर तिरंगा राबवण्यात येत आहे. या निमित्ताने वाशीम शहरातल्या भटक्या समाजाच्या नागरिकांनीही आपल्या पालावर आज तिरंगा फडकावला. या कुटुंबांमधल्या ज्येष्ठांनी लहान मुलांना तिरंग्याचा अर्थ, बलिदानाची गाथा आणि देशभक्तीचं महत्त्व समजावून सांगितलं.   हिंगोली जिल्ह्यात औंढा नागनाथ इथल्या भक्त निवासात शासकीय योजनांची माहिती देणारं मल्टिमीडिया प्रदर्शन सुरू झालं आहे. हे प्रदर्शन केंद्र सरकारच्या माहिती प्रसारण मंत्रालयाच्या नांदेड येथील केंद्रीय संचार ब्य...

August 10, 2025 6:46 PM August 10, 2025 6:46 PM

views 7

राज्यात ‘हर घर तिरंगा’ मोहिमेअंतर्गत विविध उपक्रम

हर घर तिरंगा मोहिमेअंतर्गत राज्यभरात विविध उपक्रम राबवले जात आहेत. याअंतर्गत आज पनवेल महानगरपालिकेतर्फे तिरंगा सायकल फेरीचं आयोजन करण्यात आलं. ३००पेक्षा जास्त सायकलस्वारांनी या फेरीत भाग घेतला. या अभियानांतर्गत नांदेड महापालिकाही २ ऑगस्टपासून अनेक उपक्रम राबवत आहे. याचाच एक भाग म्हणून आज हडको इथून तिरंगा बाईक फेरी काढण्यात आली.

August 14, 2024 1:41 PM August 14, 2024 1:41 PM

views 14

गृहमंत्री अमित शाह यांनी निवासस्थानावर राष्ट्रध्वज फडकवला

“हर घर तिरंगा” मोहिमेचा भाग म्हणून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज त्याच्या नवी दिल्लीतल्या निवासस्थानावर राष्ट्रध्वज फडकवला. कोट्यवधी भारतीयांमधली एकता,एकनिष्ठता आणि अभिमान याचं प्रतीक म्हणजेच तिरंगा, असं त्यांनी आपल्या समाजमाध्यमावरच्या नोंदीमध्ये म्हटलं आहे. घरावर तिरंगा फडकवताना देशाच्या स्वातंत्र्यासाठी सर्वस्वाचा त्याग करणाऱ्या देशनायकांचं स्मरण होत असल्याचंही त्यांनी लिहिलं आहे.