June 14, 2024 8:18 PM June 14, 2024 8:18 PM

views 30

पाच दिवसांच्या वार्षिक हज यात्रेला प्रारंभ

हजच्या ५ दिवसीय यात्रेला आजपासून सुरुवात झाली आहे. यानिमित्त सौदी अरेबियातल्या मीना शहरात आज जगभरातले सुमारे २० लाख भाविक जमा झाले आहेत. हे यात्रेकरू आज मीना शहरातच मुक्काम करणार असून उद्या पहाटे ते अराफतकडे मार्गक्रमण करणार आहेत. सौदी अरेबियात गोळा झालेल्या २० लाख भाविकांमध्ये पावणे २ लाख भारतीयांचा समावेश आहे. त्यापैकी १ लाख ४० हजार २० हज कमिटीच्या माध्यमातून तर ३५ हजार यात्रेकरू खाजगीरित्या गेले आहेत. विशेष म्हणजे या भारतीय भाविकांमध्ये ५ हजार महिलांचाही समावेश असून त्या कोणत्याही पुरुष सोबती...