November 23, 2025 11:06 AM November 23, 2025 11:06 AM
6
हज यात्रेशी संबंधित सर्व प्रक्रिया डिजिटल करून मानवी हस्तक्षेप दूर करण्याच्या सूचना
हज यात्रेशी संबंधित सर्व प्रक्रिया डिजिटल करून मानवी हस्तक्षेप दूर करण्याच्या सूचना केंद्रीय अल्पसंख्याक सचिव चंद्र शेखर कुमार यांनी भारतीय हज समितीला दिल्या आहेत. मुंबईत झालेल्या हज परिषदेत ते बोलत होते. हज यात्रेकरूंच्या थकीत रकमेपैकी ७५ टक्के त्वरित आणि उर्वरित २५ टक्के निर्धारित पडताळणी पूर्ण केल्यावर देण्याचे आदेश त्यांनी दिले. गेल्या आठवड्यात मृत्युमुखी पडलेल्या हज यात्रेकरूंना यावेळी आदरांजली वाहण्यात आली.