April 12, 2025 2:42 PM April 12, 2025 2:42 PM

views 6

डॉक्टर चंद्रशेखर कुमार यांनी हज यात्रेच्या तयारीची केली पाहणी

अल्पसंख्यक व्यवहार मंत्रालयाचे सचिव डॉक्टर चंद्रशेखर कुमार यांनी आज सौदी अरेबियात जाऊन हज यात्रेच्या तयारीची पाहणी केली. हज यात्रेसाठी राहण्याची उत्तम सोय आणि स्वच्छतेबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलं.   हज यात्रेसाठी भाविकांनी सुविधा पुरवण्यात सरकार कोणतीही कसर ठेवणार नाही असं अल्पसंख्यक व्यवहार मंत्रालयानं समाजमाध्यमाद्वारे म्हटलं आहे.

August 14, 2024 1:30 PM August 14, 2024 1:30 PM

views 12

पुढच्या वर्षीच्या हज यात्रेसाठी अर्ज करण्यास सुरूवात

पुढच्या वर्षी होणाऱ्या हज यात्रेसाठी अर्ज स्वीकारण्याची सुरुवात झाली असून अर्ज करण्याची शेवटची तारीख ९ सप्टेंबर आहे. केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री किरेन रिजीजू यांनी काल नवी दिल्लीत अर्ज स्वीकारण्याच्या प्रक्रियेची सुरुवात केली. २०२५ च्या हज यात्रेला जाणाऱ्या भारतीयांसाठी  सौदी अरेबियानं १ लाख ७५ लाख यात्रेकरुंचा कोटा दिला आहे. यंदा पहिल्यांदाच  हज सुविधा ऍपवर अर्ज करता येणार आहेत.