April 11, 2025 10:30 AM April 11, 2025 10:30 AM
12
दृकश्राव्य परिषदेतील XR क्रिएटर हॅकेथॉनमध्ये 5 संघांना विजेतेपद
माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं वेव्जलॅप्स यांच्या सहकार्यानं आयोजित केलेल्या दृकश्राव्य परिषदेतील XR क्रिएटर हॅकेथॉनमध्ये पाच संघांना विजेतेपद देण्यात आलं. विविध शहरं आणि संस्थांमधील विद्यार्थी, व्यावसायिक आणि उद्योजक या हॅकेथॉनमध्ये सहभागी झाले होते. पाच विविध श्रेणींमध्ये ही स्पर्धा झाली. इमर्सिव्ह तंत्रज्ञानात देशाची भुमिका अधोरेखित करण्यासाठी या हॅकेथॉनचं आयोजन करण्यात आलं होतं. आरोग्यसेवा-तंदुरुस्ती आणि कल्याण, शैक्षणिक परिवर्तन, पर्यटनातील नवीन संधी, डिजिटल मीडिया आणि मनोरंजन आणि किरकोळ बा...