November 1, 2025 3:31 PM November 1, 2025 3:31 PM

views 32

एच-१बी व्हिसा शुल्क निर्णयावर पुनर्विचार करावा, ट्रम्प यांना आवाहन

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एच-१बी व्हिसा आणि त्यासाठी १ लाख अमेरिकी डॉलर्स शुल्क लागू करण्याच्या आपल्या घोषणेचा पुनर्विचार करावा अशी विनंती अमेरिकेतल्या लोकप्रतिनिधीनी केली आहे. माहिती तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातल्या अमेरिकेच्या यशामागे भारतीय नागरिकांची मोठी भूमिका असून, या निर्णयामुळे भारत-अमेरिका संबंधांवर नकारात्मक परिणाम होईल असं त्यांनी ट्रम्प यांना लिहिलेल्या निवेदनात म्हटलं आहे.   अमेरिकेतल्या अनेक आघाडीच्या कंपन्या एच-१बी धारक व्यक्तींनी स्थापन क...

October 17, 2025 3:14 PM October 17, 2025 3:14 PM

views 31

H1B विजासंदर्भात ट्रम्प यांच्या निर्णयाला अमेरिकन चेंबर ऑफ कॉमर्सकडून न्यायालयात आव्हान

अमेरिकेत उच्च कुशल परदेशी कामगारांसाठी नवीन H-1B व्हिसावर एक लाख डॉलर्स शुल्क आकारण्याच्या राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयाला अमेरिकेच्या चेंबर ऑफ कॉमर्सने न्यायालयात आव्हान दिलं आहे. या शुल्कामुळे H-1Bवर अवलंबून असलेल्या व्यवसायांना त्यांच्या कामगार खर्चात लक्षणीय वाढ करणं किंवा कौशल्य कमी असलेल्या कामगारांना कामावर ठेवणं यापैकी एकाची निवड करावी लागेल, असं चेंबर ऑफ कॉमर्सचं म्हणणं आहे. कॅलिफोर्निया इथल्या फेडरल न्यायालयात विविध संघटना आणि गटांकडून या निर्णयाला आव्हान दिलं जात आहे.

September 20, 2025 10:46 AM September 20, 2025 10:46 AM

views 64

H-1B visa प्रणालीसाठी अमेरिकेद्वारे नियमांमध्ये बदल

अमेरिकेत काम करण्यासाठी आवश्यक असलेल्या H-1B Visa प्रणालीसाठी आता 88 लाख रुपये शुल्क आकारलं जाणार आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी यासंदर्भातील घोषणापत्रावर स्वाक्षरी केली. तंत्रज्ञान क्षेत्रातील परदेशी कामगारांचा अमेरिकेत येण्याचा ओघ कमी करण्याच्या उद्देशाने हे पाऊल उचलण्यात आलं आहे.   या व्हिसावर इतर देशांमधून कामगार आणण्यासाठी अर्ज करणाऱ्या कंपन्यांना दरवर्षी प्रति व्हिसा हे शुल्क भरावं लागेल आणि स्थानिक अमेरिकी नागरिकांपेक्षा हे परदेशी नागरिक अधिक कुशल असल्याचं सुनिश्चि...

December 29, 2024 6:44 PM December 29, 2024 6:44 PM

views 14

एचवन बी व्हिसा हा उत्तम उपक्रम असून त्याने उत्कृष्ट कौशल्य प्राप्त केलेले परदेशी नागरिक  मिळवून दिले – डोनाल्ड ट्रम्प

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एका मुलाखतीत अमेरिकेच्या एच-वन बी व्हिसा कार्यक्रमाची पाठराखण केली आहे. एचवन बी व्हिसा हा उत्तम उपक्रम असून त्याने  अमेरिकेतल्या खास नोकऱ्यांसाठी उत्कृष्ट कौशल्य प्राप्त केलेले परदेशी नागरिक  मिळवून दिले असं ट्रम्प यांनी यावेळी सांगितलं. आपल्या पहिल्या कार्यकाळात ट्रम्प यांनी परदेशी व्यक्तींना रोजगारासाठी व्हिसा देण्याच्या धोरणाबाबत कडक टीका केली होती.   एचवन बी व्हिसामुळे अमेरिकन कंपन्यांना उत्कृष्ट कौशल्य प्राप्त केलेले परदेशी नागरिक मिळतात ज्य़ातून...