November 21, 2024 8:01 PM November 21, 2024 8:01 PM

views 12

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना गयानाकडून ‘द ऑर्डर ऑफ एक्सलन्स’ हा सर्वोच्च सन्मान प्रदान

प्रधानमंत्री नरेन्द्र मोदी यांना आज गयाना देशातला सर्वोच्च सन्मान ‘द ऑर्डर ऑफ एक्सलन्स’ प्रदान करण्यात आला. मोदी यांचं दूरदृष्टी असलेलं नेतृत्व, जागतिक पातळीवर विकसनशील देशांच्या हक्कांना त्यांनी मिळवून दिलेलं व्यासपीठ, आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या समुदायासाठी त्यांचं उल्लेखनीय कार्य आणि भारत-गयाना देशांमधले संबंध अधिक दृढ करण्यासाठीची त्यांची कटिबद्धता आदींसाठी मोदी यांना  या सर्वोच्च पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. गयानाच्या स्टेट हाऊस मध्ये आज एका समारंभात गयानाचे अध्यक्ष डॉ. मोहम्मद इरफान अली...

November 21, 2024 11:11 AM November 21, 2024 11:11 AM

views 16

भारत आणि गयाना यांच्यात सहकार्य वाढवण्यासाठी १० करारांवर स्वाक्षरी

भारत आणि गयाना यांनी आरोग्य, हायड्रोकार्बन, कृषी आणि संबंधित क्षेत्रांसह अनेक क्षेत्रात सहकार्य वाढवण्यासाठी दहा करारांवर स्वाक्षरी केली आहे. वैद्यकीय उत्पादने, जनऔषधी योजना, सांस्कृतिक देवाणघेवाण कार्यक्रम, गयानामध्ये UPI सारखी प्रणाली तैनात करणे आणि प्रसार भारती आणि नॅशनल कम्युनिकेशन नेटवर्क, गयाना यांच्यात प्रसारण क्षेत्रात सहकार्य आणि सहकार्य यावर सामंजस्य करार करण्यात आले.