January 6, 2025 12:55 PM January 6, 2025 12:55 PM
2
गुरू गोविंदसिंह यांच्या जयंतीनिमित्त सर्वत्र प्रकाशपर्वाचा उत्साह
शिखांचे दहावे गुरू, गुरू गोविंदसिंह यांच्या जयंतीनिमित्त आज सर्वत्र प्रकाश पर्व साजरं करण्यात येत आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी गुरु गोविंद सिंह यांना आदरांजली अर्पण केली आहे. मानवतेच्या कल्याणासाठी गुरु गोविंद सिंह यांनी केलेलं कार्य सर्वांना प्रेरणादायी असल्याचं राष्ट्रपतींनी समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. प्रकाश पर्वानिमित्त ठिकठिकाणच्या गुरुद्वारांमधे विशेष प्रार्थना आयोजित करण्यात आल्या आहेत. तसंच गुरु गोविंदसिंगाच्या प्रतिमांचे जुलूस निघा...