February 22, 2025 3:11 PM February 22, 2025 3:11 PM
6
भारतीय धावपटू गुलवीर सिंगकडून धावण्याच्या स्पर्धेत नवा विक्रम
अमेरिकेत बोस्टन विद्यापीठाच्या वतीनं आयोजित विविध धावण्याच्या स्पर्धेअंतर्गत भारताचा धावपटू गुलवीर सिंग यांनं पुरुषांच्या ५००० मीटर इनडोअर शर्यतीत १३ मिनीटांपेक्षा कमी वेळ नोंदवत ऐतिहासिक कामगिरी केली. अशी कामगिरी करणारा तो पहिला भारतीय धावपटू ठरला आहे. गुलवीर यानं १२ मिनिटे ५९ सेकंद आणि ७७ मिलीसेकंदात हे अंतर पार करत, नव्या राष्ट्रीय तसंच आशियाई विक्रमाचीही नोंद केली. या कामगिरीमुळे गुलवीर याच वर्षी सप्टेंबरमध्ये टोकियो इथं होणाऱ्या विश्व अजिंक्यपद स्पर्धेसाठीही पात्र ठरला आहे.