August 2, 2025 8:20 PM

views 33

पाल अभयारण्यात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते जंगल सफारीचं उद्घाटन

सातपुडा पर्वतरांगेच्या कुशीत वसलेल्या जळगाव जिल्ह्यातल्या पाल अभयारण्यात आज जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते जंगल सफारीचं उद्घाटन झालं.  सातपुडा जंगल सफारी हा ग्रामीण विकास आणि पर्यावरण संवर्धनाचा अभिनव संकल्प असून जैवविविधतेचं संवर्धन, स्थानिक रोजगार आणि पर्यावरण पर्यटनासाठी जंगल सफारी महत्त्वाचा टप्पा ठरेल असं,  गुलाबराव पाटील यावेळी म्हणाले.  जंगल सफारीचा पहिला टप्पा सुमारे  अडीच कोटी रुपये निधीतून पूर्ण करण्यात आला आहे. 

September 12, 2024 9:03 AM

views 78

जल जीवन मिशन तसंच स्वच्छ भारत अभियानाच्या अंमलबजावणीला गती द्यावी – मंत्री गुलाबराव पाटील

जल जीवन मिशन तसंच स्वच्छ भारत अभियानाच्या अंमलबजावणीला गती द्यावी, असे निर्देश पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले आहेत. काल मंत्रालयात झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. घनकचरा व्यवस्थापन, सार्वजनिक शौचालयांची उभारणी, वैयक्तिक घरकुलं तसंच शौचालयांची कामं जलद पूर्ण करावीत, १५ व्या वित्त आयोगातून मिळणाऱ्या निधीतून या घटकांवर खर्च करण्याच्या सूचना ग्रामपंचायतींना देण्यात याव्यात, असंही गुलाबराव पाटील यांनी सांगितलं.