October 22, 2024 6:32 PM October 22, 2024 6:32 PM

views 5

न्यायालयाचा हस्तक्षेप कमी व्हावा याकरता कायद्याचा मसुदा स्पष्ट पाहिजे – गृहमंत्री अमित शाह

न्यायालयाचा हस्तक्षेप कमीत कमी व्हावा याकरता कायद्याचा मसुदा स्पष्ट असला पाहिजे असं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी म्हटलं आहे. गुजरातमधे गांधीनगर इथं गुजरात विधानसभेच्या आमदारांसाठी आयोजित कार्यशाळेत ते बोलत होते. कायदा सुस्पष्ट आणि त्रुटीविरहीत असला की त्याची अंमलबजावणी करणंही सोपं होईल, आणि लोकशाहीच्या कायापालटाला हातभार लागेल  असं ते म्हणाले. आमदारांनी कायद्याचा मसुदा तयार करण्याचं प्रशिक्षण घ्यावं असं आवाहन शहा यांनी केलं. गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल आणि विधानसभा अध्यक्ष शंकर चौधरी...

September 1, 2024 8:16 PM September 1, 2024 8:16 PM

views 9

गुजरातमध्ये पूरग्रस्त भागाचा आढावा घेण्यासाठी आंतरमंत्रालयीन केंद्रीय पथकाची स्थापना

गुजरातमधे पाऊस आणि पुरानं झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय गृहमंत्रालयानं राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन संस्थेच्या कार्यकारी संचालकांच्या नेतृत्वाखाली आंतरमंत्रालयीन केंद्रीय पथकाची स्थापना केली असून हे पथक लवकरच राज्यातल्या पूरग्रस्त जिल्ह्यांना भेट देणार आहे.   यावर्षी गृह मंत्रालयानं विविध राज्यांसाठी आंतरमंत्रालयीन केंद्रीय पथकांची स्थापना केली असून या पथकानं आसाम केरळ मिझोराम आणि त्रिपुरा या राज्यांमध्ये झालेल्या नुकसानीचं जागेवरच मूल्यांकन करण्यासाठी त्या राज्यांकडून मदतीची ...

August 27, 2024 1:37 PM August 27, 2024 1:37 PM

views 17

गुजरातमध्ये गेले दोन दिवस पडणाऱ्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत

गुजरातमध्ये गेले दोन दिवस सातत्याने पडणाऱ्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. अहमदाबाद, बडोदा, सुरत आणि नवसारीला पावसाचा सर्वाधिक फटका बसला आहे. राज्यातल्या राष्ट्रीय महामार्गांसह सुमारे ५०० रस्त्यांवरची वाहतूक ठप्प झाली आहे. सखल भागातल्या सुमारे १७ हजार रहिवाशांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे. राज्यातली ५० हून अधिक धरणं भरून वाहत आहेत. आणंद मार्गे जाणाऱ्या सर्व रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी गांधीनगर इथल्या आप्तकालीन साहाय्य केंद्रात उच्चस्...

July 17, 2024 12:53 PM July 17, 2024 12:53 PM

views 11

गुजरातमध्ये 13 सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांच्या शैक्षणिक शुल्कात मोठी कपात

गुजरातमधल्या 13सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांच्या शैक्षणिक शुल्कात कपात करण्यात आली आहे. मंत्रीमंडळांच्या बैठकीत काल हा निर्णय घेण्यात आला. चालू शैक्षणिक वर्षात जीएमईआरएस महाविद्यालयामध्ये शुल्कवाढीसाठी सरकारने जारी केलेल्या अधिसुचनेला विद्यार्थी आणि राजकीय पक्षांनी विरोध केल्यानंतर हे पाऊल उचलण्यात आलं आहे.   गांधीनगरमध्ये याविषयी माहिती देताना गुजरातचे आरोग्यमंत्री ऋषीकेश पटेल यांनी विद्यार्थ्यांच्या हितासाठी हा निर्णय घेतला असून राज्य सरकारच्या 13 वैद्यकीय महाविद्यालयांतल्या 2100 जागांसाठ...

July 16, 2024 1:11 PM July 16, 2024 1:11 PM

views 14

पश्चिम किनारपट्टी आणि गुजरातमध्ये आज मुसळधार पावसाचा अंदाज

संपूर्ण पश्चिम किनारपट्टी आणि गुजरातमध्ये आज मुसळधार पाऊस होण्याची शक्यता भारतीय हवामान विभागानं वर्तवली आहे. कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, गुजरात, किनारपट्टीसह कर्नाटक, सौराष्ट्र आणि कच्छमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. या भागांसाठी आज अतिमुसळधार आणि केरळमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.   पुढील चार दिवसांत तेलंगण, आंध्र प्रदेशचा किनारपट्टीचा भाग आणि यानाम, छत्तीसगड, उत्तर कर्नाटकात मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. ओडिशाच्या किनारपट्टीवर कमी दाबाचं क्षेत्...

July 1, 2024 3:44 PM July 1, 2024 3:44 PM

views 18

नीट युजी परीक्षेतल्या गैरप्रकारांसंदर्भात गुजरातमधे एका खासगी शाळेच्या मालकाला अटक

नीट युजी परीक्षेतल्या गैरप्रकारांसंदर्भात सीबीआयने गुजरातमधे एका खासगी शाळेच्या मालकाला अटक केली आहे. ५ मे रोजी झालेल्या नीट परीक्षेचं केंद्र या शाळेतही होतं. गुजरात पोलिसांनी यापूर्वी ५ जणांना अटक केली असून नीट परीक्षा उत्तीर्ण करण्यासाठी किमान २७ विद्यार्थ्यांकडून प्रत्येकी १० लाख रुपयांची मागणी केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. सीबीआयने चौकशी हातात घेतल्यावर या अरोपींचा ताबा मागितला आहे.

June 24, 2024 7:15 PM June 24, 2024 7:15 PM

views 8

नीट पेपरफुटीप्रकरणी सीबीआयचं पथक गुजरातमध्ये दाखल

NEET परीक्षेतील कथित गैरप्रकारांची चौकशी करण्यासाठी केंद्रीय अन्वेषण विभाग अर्थात सीबीआयचं एक पथक गुजरातमधल्या गोध्रा इथं दाखल झालं आहे. गोध्रा इथल्या एका परीक्षा केंद्रावर ५ मे रोजी NEET चा पेपर झाल्यानंतर तीन दिवसांनी तिथल्या पोलीस स्टेशनमध्ये परीक्षेतल्या गैरप्रकाराबद्दल एफआयआर नोंदवण्यात आला होता. गोध्रा पोलिसांनी या प्रकरणात ३० विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका सोडवण्यास मदत केल्याच्या आरोपाखाली आतापर्यंत पाच आरोपींना अटक केली आहे.   दरम्यान, गुजरातमधल्या पंचमहाल जिल्हा न्यायालयाच्या सत्र ...