May 6, 2025 8:14 PM May 6, 2025 8:14 PM
13
गुजरातमध्ये वादळी पावसामुळे १४ जणांचा मृत्यू
गुजरातच्या अनेक भागांना आज सलग दुसऱ्या दिवशी वादळी पावसानं झोडपलं. पावसामुळे झालेल्या दुर्घटनांमधे १४ जणांचा मृत्यू झाला. मुख्यतः सौराष्ट्र आणि गुजरातमधल्या ७७ पेक्षा जास्त तालुक्यांमधे आज अवकाळी पावसानं हजेरी लावली. भावनगर जिल्ह्यात महुआ इथं साडेतीन इंचापेक्षा जास्त पाऊस झाला. पुढचे काही दिवस गुजरातमधे मेघगर्जना आणि विजांचा कडकडाट, जोरदार वाऱ्यांसह पाऊस पडण्याची शक्यता असून वाऱ्याचा वेग ताशी ५० ते ६० किलोमीटरपर्यंत असण्याची शक्यता, हवामान विभागानं व्यक्त केली आहे.