July 28, 2025 2:36 PM July 28, 2025 2:36 PM
2
गुजरातमध्ये मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत
गुजरातच्या अनेक भागात मुसळधार पाऊस पडल्यामुळे खेडा आणि अहमदाबाद सह अनेक जिल्ह्यांमध्ये जनजीवन विस्कळीत झालं आहे. मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी गांधीनगर इथल्या राज्य आपत्कालीन नियंत्रण केंद्रात बैठक घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला. राज्यात आज सर्वत्र पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे.