April 2, 2025 11:00 AM

views 30

गुजरात मधे फटक्याच्या कारखान्याला लागलेल्या आगीत 18 जणांचा मृत्यू

गुजरात मधील बनासकांठा जिल्ह्यातील दिसा येथील फटक्याच्या कारखान्याला लागलेल्या आगीत 18 जणांचा मृत्यू झाला असून, अद्यापही 23 जण अडकले असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळवलं असूंन, ढीगऱ्याखाली अडकलेल्या कामगारांना बाहेर काढण्यासाठी बचाव कार्य सुरू आहे.   प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला असून, राष्ट्रीय मदत निधीतून मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 2 लाख तर जखमींच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 50 हजारांची मदत जाहीर केली आहे. राज्य सरक...

February 2, 2025 3:41 PM

views 14

गुजरातमधे सापुतारा घाटात झालेल्या बस अपघातात 5 जणांचा मृत्यू , 17 जण जखमी

गुजरातच्या डांग जिल्ह्यात सापुतारा घाटात दोनशे फूट दरीत बस कोसळून आज झालेल्या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला, तर १७ जण जखमी झाले आहेत. ही बस भाविकांना घेऊन महाराष्ट्रातल्या त्र्यंबकेश्वर इथून गुजरातमधल्या द्वारका इथं जात होती. सर्व भाविक मध्यप्रदेशातले रहिवासी आहेत. जखमी  प्रवाशांना अहवा इथल्या रुग्णालयात दाखल केल्याचं पोलिसांनी सांगितलं.