December 25, 2025 10:18 AM December 25, 2025 10:18 AM

views 27

अरवली पर्वतरांगेतील खनिजांच्या नवीन खाणपट्ट्यांवर केंद्राद्वारे बंदी

दिल्ली ते गुजरातपर्यंत पसरलेल्या संपूर्ण अरवली पर्वतरांगेचे अवैध खाणकामापासून संरक्षण करण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल उचलत, केंद्राने राज्यांना अरवली पर्वतरांगेत कोणत्याही नवीन खाणपट्ट्या मंजूर करण्यावर संपूर्ण बंदी घालण्याचे निर्देश दिले आहेत. पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने एका निवेदनात पर्वतरांगेची अखंडता टिकवून ठेवण्यासाठी ही बंदी संपूर्ण अरवली प्रदेशात समान रीतीने लागू होणार असल्याचं म्हटलं आहे.  

November 9, 2025 2:03 PM November 9, 2025 2:03 PM

views 27

आयसीस दहशतवादी संघटनेशी संबंधित ३ संशयितांना गुजरातमधे अटक

आयसीस या दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याच्या संशयावरून, गुजरात मधल्या दहशतवाद विरोधी पथकानं गांधीनगरमध्ये अदलाज इथून आज ३ जणांना अटक केली, आणि त्यांच्याकडून शस्त्र जप्त केली. ते देशाच्या विविध भागात हल्ला करण्याचा कट रचत होते, असा आरोप आहे. या प्रकरणी पुढला तपास सुरु आहे. 

October 26, 2025 8:41 AM October 26, 2025 8:41 AM

views 137

रिध्दपूर इथं जागतिक कीर्तीचं मराठी भाषा विद्यापीठ उभारणार-मुख्यमंत्र्यांची ग्वाही

'सर्वज्ञ चक्रधर स्वामींनी सामान्य माणसाला आध्यात्मिक दिशा दाखविण्याबरोबर समाजात समता स्थापन करण्याचा विचार दिला. ही विचारसरणी राज्यासह देशासाठी महत्वाची आहे', असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. नाशिक इथं आयोजित अखिल भारतीय महानुभाव परिषदेच्या 38 व्या अधिवेशनात ते काल बोलत होते. यावेळी जलसंपदामंत्री गिरीश महाजन, शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे, खासदार भास्कर भगरे, परिषदेचे नवनिर्वाचित राष्ट्रीय अध्यक्ष मोहन कारंजेकर बाबा यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. रिद्धपूर या तीर्थक्...

October 21, 2025 3:26 PM October 21, 2025 3:26 PM

views 18

गुजरात आणि हरियाणाला १५ व्या वित्त आयोगाअंतर्गत ७३० कोटी रुपयांचं अनुदान

१५ व्या वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार केंद्रसरकारने गुजरात आणि हरियाणाला ७३० कोटी रुपयांचं अनुदान जारी केलं.  ग्रामीण स्वराज्य संस्थांच्या सशक्तीकरणासाठी या दोन्ही राज्याना आर्थिक सहाय्य करण्याची गरज वित्त आयोगाने वर्तवली होती. यापैकी  ५२२ कोटी रुपयांचा दुसरा हप्ता आणि पहिल्या हप्त्यापैकी १३ कोटी रुपये गुजराथकडे वर्ग करण्यात आले आहेत. तर हरयाणाला  २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठीचा १९५ कोटी रुपयांचा पहिला हप्ता देण्यात आला आहे.

October 3, 2025 3:05 PM October 3, 2025 3:05 PM

views 29

दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेला गुजरातमध्ये सुरुवात

जमीन मालकीविषयक प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन या विषयावरच्या  गांधीनगर इथं आज सुरुवात झाली. गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी उद्घाटन सत्रात बोलताना नागरिक जमिनीच्या नोंदींचं  डिजिटायझेशन आणि स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर करण्याचं  महत्व अधोरेखित केलं.     या परिषदेत आज नवीन महसूल कार्यलयांचं, महसूल डायरीचं  आणि एकात्मिक जमीन प्रशासन प्रणालीचं उद्घाटनही झालं. तसंच स्वामित्व कार्डांचं वाटपही करण्यात आलं. 

September 20, 2025 9:42 AM September 20, 2025 9:42 AM

views 33

प्रधानमंत्री गुजरात दौऱ्यावर, ‘समुद्र से समृद्धी’ उपक्रमाअंतर्गत विविध प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घटान करणार

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज गुजरातच्या एक दिवसाच्या दौऱ्यावर आहेत. ते भावनगर इथं समुद्रक्षेत्राशी संबंधित 'समुद्र से समृद्धी' या कार्यक्रमात सहभागी होतील आणि 34 हजार 200 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या अनेक विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करतील. यामध्ये सागरी प्रकल्प, एलएनजी पायाभूत सुविधा, अक्षय ऊर्जा, महामार्ग, आरोग्यसेवा आणि शहरी वाहतूक यासह अनेक क्षेत्रांचा समावेश आहे.   मुंबईतील नवीन क्रूझ टर्मिनल, कोलकाता आणि पारादीप इथं बंदरांवर नवीन कंटेनर सुविधा आणि दीनदयाळ बंदरावर हरित ज...

July 9, 2025 9:10 PM July 9, 2025 9:10 PM

views 16

गुजरातमधे अपघातातल्या मृतांना राज्य सरकारकडून आर्थिक मदत जाहीर

गुजरातमध्ये बडोदा जिल्ह्यात पदर इथं आज पहाटे पुलाचा काही भाग महिसागर नदीत कोसळून झालेल्या दुर्घटनेत ९ जणांचा मृत्यू झाला, तर अनेक जण जखमी झाले आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. आणंद आणि बडोदा जिल्ह्यांना जोडणारा हा पूल होता.   अपघात झाल्यानंतर बडोदा जिल्हा प्रशासनानं तातडीनं बचावकार्य हाती घेतलं असून, स्थानिक नागरिकही त्यांना मदत करत आहेत. आणंद इथून अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. वाहनांची वाहतूक सुरू असताना हा पूल कोसळला. त्यामुळे अनेक वाहने पाण्यात ...

June 19, 2025 8:01 PM June 19, 2025 8:01 PM

views 22

चार राज्यांमधल्या विधानसभेच्या पाच जागांसाठी पोटनिवडणूक

चार राज्यांमधल्या ५ विधानसभा मतदारसंघांच्या पोटनिवडणुकीसाठी आज मतदान झालं. त्यात संध्याकाळी साडे पाच वाजेपर्यंत, गुजरातमधल्या विसवदर आणि  काडी या मतदारसंघांमधे ५४ टक्क्यांपेक्षा जास्त मतदान झालं. केरळमधल्या निलंबुर मतदारसंघात सुमारे ७० टक्के, पश्चिम बंगालमधल्या कालीगंज मतदारसंघात ६९ टक्के, तर पंजाबमधल्या लुधियाना मतदार संधात सुमारे ४९ टक्के, मतदान झालं.  या पाचही मतदारसंधांमधली मतमोजणी येत्या सोमवारी होणार आहे. 

May 26, 2025 1:22 PM May 26, 2025 1:22 PM

views 17

गुजरातमध्ये प्रधानमंत्र्यांच्या हस्ते विविध विकासकामांचं लोकार्पण आणि भूमीपूजन

देशाच्या विकासासाठी आवश्यक प्रत्येक गोष्ट भारतातच उत्पादित व्हावी ही काळाची गरज आहे असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. मोदी यांनी भारताचे प्रधानमंत्री म्हणून २०१४ मध्ये प्रथम शपथ घेतल्याच्या घटनेला आज ११ वर्षे पूर्ण झाली. याचं औचित्य साधून गुजरातमध्ये दाहोद इथं आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. भारतीय रेल्वेच्या रेल्वे इंजीन उत्पादन प्रकल्पाच्या उद्घाटनासह, सुमारे २४ हजार कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि लोकार्पण यावेळी मोदी यांच्या हस्ते झालं.    देशातलं औद्...

May 26, 2025 10:14 AM May 26, 2025 10:14 AM

views 25

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी २ दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर

पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांच्या हस्ते आज गुजरात मधल्या दाहोद इथं 24 हजार कोटी खर्चाच्या विविध विकास कामांच्या प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन होणार आहे. गुजरातच्या 2 दिवसांच्या दौऱ्यात ते दाहोद लोकोमोटिव्ह उत्पादन संयंत्र देशाला समर्पित करणार आहेत. या संयंत्रामुळे पुढील 11 वर्षांत 1 हजार 200 मालगाड्यांच्या इंजिनांची निर्मिती होऊन रेल्वेच्या मालवहन क्षमतेत वाढ होणार आहे. यामुळे सरकारच्या मेक इन इंडिया उद्दिष्टासोबतच जगभरातल्या निर्यातीमुळे मेक फॉर वर्ल्ड उद्दिष्टाचीही पूर्तता होणार आहे.